डिव्होर्स हा शब्द तुम्ही वाचला असेल, म्हणजेच घटस्फोट. पण तुम्ही कधी ‘स्लीप डिव्होर्स’ हा शब्द वाचला आहेत का? स्लीप डिव्होर्स हा नवा ट्रेंड सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण याच स्लीप डिव्होर्समुळे अनेक जण आपल्या नात्यातील ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. हा स्लीप डिव्होर्स नेमका काय आहे? आणि याचा नात्यावर कसा परिणाम होतो, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

स्लीप डिव्होर्स म्हणजे काय?

स्लीप डिव्होर्स म्हणजे वेगवेगळे झोपणे. एखादे जोडपे ठरवून वेगवेगळ्या बेडवर किंवा वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपतात, यालाच स्लीप डिव्होर्स म्हणतात.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा

हेही वाचा : तेलकट किंवा कोरड्या त्वचेसाठी कोणता फेसपॅक आहे योग्य? तज्ज्ञांनी सांगितले संत्र्याच्या सालीपासून बनवता येणारे एकापेक्षा एक भारी फेसपॅक….

स्लीप डिव्होर्स खरेच फायदेशीर आहे का?

हल्ली बदलत्या लाइफस्टाइलनुसार नात्यांमध्ये खूप स्ट्रेस दिसून येतो. एकमेकांना मिळणारा अपुरा वेळ आणि त्यामुळे वाढलेले गैरसमज या सर्वांचा थेट परिणाम नात्यावर होतो. कधीकधी गोष्टी इतक्या बिघडतात की, घटस्फोटापर्यंत जातात. पण घटस्फोट घेण्याचा विचार करण्याआधी तुम्ही स्लीप डिव्होर्स ट्राय करू शकता.
या स्लीप डिव्होर्समुळे तुमचे नातेही टिकेल आणि घटस्फोटापासून तुम्ही वाचाल. मुळात स्लीप डिव्होर्समुळे तुम्ही तुमचे नातेही सुधारू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा : Wi-Fi Speed : तुमच्या ‘या’ चुकांमुळे Wifi चं स्पीड होतं कमी? ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका…

कमी झोपेमुळे नात्यावर परिणाम होतो का?

कमी झोपेचा थेट परिणाम नात्यावर होतो. अपुऱ्या झोपेमुळे नात्यामध्ये तणाव येण्याची जास्त शक्यता असते. काही जण रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर काम करत असतात, तर काही लोकांना रात्री घोरण्याची सवय असते.

काही लोकांना उशिरा झोपण्याची सवय असते, तर काही जणांना वारंवार वॉशरूमला जाण्याची सवय असते. या सवयींमुळे त्यांच्या पार्टनरची झोप पूर्ण होत नाही. अशा वेळी अनेक जोडपी स्लीप डिव्होर्सचा पर्याय निवडतात.

(टीप : वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारीत आहे.)