Monkeypox Outbreak: करोनानंतर आता जगभरात मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले आहे. मंकीपॉक्स हा एक झुनोसिस आजार आहे. याचा अर्थ असा की, हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. सामान्यतः या आजाराची लक्षणे कमी असते. आतापर्यंत खार, उंदीर, डॉर्मिस, माकडांच्या विविध प्रजाती आणि प्राण्यांमधून हा आजार मानवांमध्ये पसरत आहे. प्राण्यांच्या थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता अधिक आहे, यामुळे आता या आजाराबाबत भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत, ते जाणून घेऊयात.

जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे २०,००० रुग्ण आढळून आले आहेत. यात पाकिस्तान, आफ्रिका आणि बांगलादेशमध्ये मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आणि सीमेवर विशेषत: बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Sharad Pawar on EVM machine
Sharad Pawar: “EVM सेट होऊ शकतं, याचं प्रेझेंटेशन…
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
tharala tar mag sayali slaps priya watch promo
प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवणार सायली! घटस्फोटाचं कारस्थान होणार उघड; दाखवला ‘तो’ पुरावा, पाहा जबरदस्त प्रोमो
two friends hello tune joke
हास्यतरंग :  तुझा नंबर…
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
Paaru
‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’चा महासंगम; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “अशी अंधश्रद्धा…”

मंकीपॉक्स लक्षणे काय आहेत?

मंकीपॉक्सबाधित रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे सहसा जीवघेणी नसली तरी काही प्रकरणांमध्ये ते गंभीर असू शकते. लक्षणांमध्ये सुरुवातीला शरीरावर पुरळ उठण्यास सुरुवात होते. पुरळ उठण्याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. यामुळे जखमा होऊ शकतात. पू झाल्यानंतर जखम वाढून त्यात खड्डा पडतो.

हेही वाचा – सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था

मंकीपॉक्स कसा पसरतो?

रक्त, शारीरिक द्रव किंवा संक्रमित प्राण्यांच्या त्वचेच्या किंवा श्लेष्मल जखमांच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू प्राण्यांमधून थेट मानवामध्ये पसरू शकतो.

याव्यतिरिक्त एकापेक्षा अधिक पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवल्याने, डोळे, श्वसनसंस्था, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकीपॉक्स प्रवेश करतो. याशिवाय संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे आणि टॉवेल यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्यानेदेखील मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता असते.

मंकीपॉक्स विषाणू गंभीर आहे का?

मंकीपॉक्स हा आजार सामान्यत: सौम्य आहे, जो विशिष्ट उपचारांनंतर बरा होता. मात्र, काही प्रकरणांमध्ये त्याचे गंभीर रूप दिसू शकते. यातही लहान मुले, गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याचे संक्रमण वेगाने होण्याची शक्यता असते.

१९५८ मध्ये प्रथम प्रयोगशाळेतील माकडांमध्ये हा विषाणू आढळून आला, म्हणून त्याला “मंकीपॉक्स” असे नाव देण्यात आले.