पांढरा चहा म्हणजे काय?; जाणून घ्या तो इतका महाग का आहे?

चहांचे अनेक प्रकार निघाले आहेत. त्यात सर्वात महाग आहे तो म्हणजे पांढरा चहा. जाणून घेऊया पांढऱ्या चहाबद्दल.

पांढरा चहा म्हणजे काय?; जाणून घ्या तो इतका महाग का आहे?
पांढर चहा महाग असतो ( फोटो : indian express )

चहा प्यायला सर्वांना आवडतो. पावसाळ्यात तर चहाला विशेष असं महत्व आहे. भारतात तर दिवसातून तीन चार वेळा तरी चहाचे सेवन केले जाते. तसचं घरात कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासमोर चहा आधी ठेवला जातो. सध्या चहाचे अनेक प्रकार निघाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चहा अनेकजण करून पितात. पण तुम्ही पांढरा चहा बद्दल ऐकले आहे का ? जर तुम्ही याबद्दल ऐकले असेल, तर तुम्हाला हेही माहीत असेल की पांढरा चहा खूप महाग आहे. चला तर मग जाणून घेऊया पांढरा चहा म्हणजे काय आणि तो इतका महाग का आहे?

पांढरा चहा म्हणजे काय?

पांढऱ्या चहाचा उगम हा चीनमधून झाला आहे आणि आता भारतातही लोकप्रिय होत आहे.कॅमेलिया सायनेन्सिस या चहाच्या रोपाची नवीन पाने आणि कळ्या परिपूर्ण पांढरा चहा बनवण्यासाठी वाळवल्या जातात.या वनस्पतीच्या कळ्या लवकर उपटल्या जातात, ह्या कळ्या केसांसारख्या पांढर्‍या पंखांनी झाकलेल्या असतात आणि म्हणून त्यांना ‘व्हाइट टी’ असे नाव दिले जाते. लवकर कापणी केल्याने पाने आणि कळ्या ऑक्सिडायझ होऊ देत नाहीत कारण कापणी करताना ते हवेत वाळवले जातात. पांढरा चहा कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून बनवलेल्या इतर सर्व चहाच्या तुलनेत सर्वात ताजा बनतो. याची पाने हीट ड्रायरने वाळवली जात नाहीत या पानांना नैसर्गिकरित्या सुकवले जाते. हे शून्य ऑक्सिडाईज असल्याने ते खूप आरोग्यदायी आहे.

सिल्व्हर व्हाईट टी

सिल्व्हर नीडल टी हा चीनमध्ये पिकवल्या जाणार्‍या पांढर्‍या चहाचा सर्वात प्रिमियम प्रकारांपैकी एक आहे. हा चहा पांढऱ्या केसांनी झाकलेल्या मोठ्या कळ्यापासून बनवला जातो म्हणून त्याला ‘सिल्व्हर’ व्हाईट टी म्हणतात. सिल्व्हर निडलचा चहा पचनसंस्थेसाठी खूप चांगला आहे. हा चहा छातीत जळजळ, ऍसिडिटी आणि क्रॅम्प्ससाठी खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे व्हाईट टीमध्येच चहाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये दार्जिलिंग व्हाइट टी, ट्रिब्यूट आयब्रो व्हाइट टी, मंकी पिक्ड टी अशा अनेक महागड्या जाती आहेत.

हा चहा इतका महाग का आहे?

बाजारात उपलब्ध असलेल्या इतर प्रकारच्या चहाच्या तुलनेत हा चहा महाग आहे. ज्या वनस्पतीपासून काळा आणि हिरवा चहा तयार होतो त्याच वनस्पतीपासून हा पांढरा चहा आला असला तरी या पांढऱ्या चहाची लागवड करण्याची प्रक्रिया ही इतरांपेक्षा वेगळी असते. या पिकाची वाढ आणि काळजी घेण्याची संपूर्ण प्रक्रिया खूप वेळ घेणारी आहे कारण या चहाच्या उत्पादनात फक्त लहान कळ्या आणि पाने वापरली जातात. पांढर्‍या चहाची लागवड करणे खूप कठीण आहे, ज्यामुळे ते थोडे महाग होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Health Tips : दररोज पांढरा भात खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध; वाढू शकतात आरोग्यासंबंधी तक्रारींची संख्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी