Height & Weight Chart: अति वजनामुळे कोलेस्ट्रॉलपासून ते हृदयाच्या विकारापर्यंत अनेक रोग बळावतात. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक तणावही वाढतो. आपल्याला अनेकदा अति वजनामुळे समाजात किंबहुना आपल्याह माणसांमध्ये वावरताना सुद्धा न्यूनगंड जाणवू शकतो. केवळ अतिवजन नव्हे तर गरजेपेक्षा कमी वजन असणाऱ्या व्यक्तींनाही हा त्रास सहन करावा लागतोच. शरीराच्या वाढीसाठी आवश्यक पोषण न मिळाल्याने शरीर कमकुवत होते. महिलांमध्ये हा त्रास असल्यास पुढे मातृत्वापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या दोन्ही प्रकारात उपाय करायला जायचा विचार करताच एकतर दुप्पटीने खाणे किंवा जेवणच बंद करणे असे चुकीचे मार्ग सर्वजण निवडतात. पण यामुळे तुमची आहे ती समस्या बाजूलाच पडून उलट त्रास वाढण्याची शक्यता असते.

Blood Sugar Level Per Age: तुमच्या वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती असायला हवे? पाहा ‘हा’ तक्ता

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

जर आपणही यातूनच जात असाल तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला हवी असणारी परफेक्ट बॉडी म्हणजे केवळ आकारानेच नव्हे तर सुदृढ आणि मजबूत शरीर मिळवण्याची सुरुवात आज आपण करणार आहोत. वजन कमी किंवा जास्त करण्याआधी आपल्याला ध्येय ठरवण्याची गरज आहे त्यामुळे आज आपण आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार उंचीनुसार योग्य वजन किती असावे हे समजून घेऊयात, त्यासाठी खाली दिलेला हा तक्ता नीट तपासून पाहा.

उंची सरासरी वजन 
४ फूट १० इंच ४१ ते ५२ किलो
५ फूट४४ ते ५७ किलो
५ फूट २ इंच४९ ते ६३ किलो
५ फूट ४ इंच४९ ते ६३ किलो
५ फूट ६  इंच५३ ते ६७ किलो
५ फूट ८  इंच५६ ते ७१ किलो
५ फूट १० इंच५९ ते ७५ किलो
६ फूट ६३ ते ८० किलो 

दरम्यान हा तक्ता पाहिल्यावर आता या क्षणाला कदाचित तुम्ही त्या मापात बसत नसाल तरी घाबरण्याची, चिडण्याची किंवा दुःखी होण्याची अजिबातच गरज नाही. तुमच्या ध्येयातील ही पहिली पायरी आहे. तुमच्या सुदृढ शरीरप्राप्ती च्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!