Best Teas for High Blood Pressure : आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे, ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जाणारा उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा आजार वाढत चालला आहे. त्यामुळे वेळेवर नियंत्रण न ठेवल्यास हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. वैद्यकीय शास्त्रात उच्च रक्तदाबासाठी अनेक औषधे उपलब्ध असली तरीही, अलीकडील संशोधनानुसार नैसर्गिक हर्बल चहा प्यायल्याने रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित होण्यास मदत होते. काही हर्बल चहा धमन्या निरोगी ठेवतात, हृदयविकाराला प्रतिबंध घालतात.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीच्या चहा
फंक्शनल आणि ईस्टर्न मेडिसिनमध्ये बोर्ड-प्रमाणित असलेले डॉक्टर आर्नो क्रोनर यांच्या मते, जास्वंद आणि कॅमोमाइल यांसारख्या विशिष्ट चहांचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चहा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांना पर्याय नाही आहेत. पण, संशोधनानुसार या चहा उच्च रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
जास्वंदीचा चहा
‘द जर्नल ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासानुसार, ज्या प्रौढांना प्री-हायपरटेन्शन आणि माइल्ड हायपरटेन्शन होते, त्यांनी ६ आठवडे दररोज ३ कप जास्वंदीचा चहा प्यायल्यावर त्यांच्या सिस्टोलिक रक्तदाबात सरासरी ७.२ mmHg ची घट झाली. जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेल्या या चहामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. रक्तदाब कमी करण्याव्यतिरिक्त, तो कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकतो. संशोधनात असे सूचित केले आहे की, जास्वंद हृदयरोगाशी संबंधित धोक्याचे घटक कमी करण्यास मदत करू शकते. विशेषतः सिस्टोलिक रक्तदाबावर, किंवा उच्च रक्तदाबावर होणारा त्याचा परिणाम.
एका अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांनी महिनाभर दिवसातून दोनदा जास्वंदीचा चहा प्यायला, त्यांच्या रक्तदाबात लक्षणीय घट झाली. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, पहिल्या टप्प्यातील (स्टेज – १) उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब कमी करण्यासाठी हा चहा प्रभावी ठरू शकतो. ‘जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन’मधील संशोधनानुसार, हा चहा चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) व ट्रायग्लिसराइड्स कमी करतो.
कॅमोमाइल चहा
कॅमोमाइल ही एक औषधी वनस्पती असून तिच्यामध्ये दाहशामक आणि चिंताशामक गुणधर्म आहेत. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. ‘फायटोमेडिसिन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कॅमोमाइलचा अर्क GABA रिसेप्टर्सशी संवाद साधतो, ज्यामुळे मेंदू शांत होतो. तणाव, चिंता आणि झोपेच्या समस्या यांचा संबंध उच्च रक्तदाबाशी आहे आणि या समस्या कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा प्रभावी मानला जातो. हा चहा शरीराला शांत करतो आणि आराम करण्यास मदत करतो. संशोधनात असे सुचवले आहे की कॅमोमाइलमध्ये रक्तदाब कमी करणारे गुणधर्म आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात.
कैमोमाइल टी (Chamomile Tea)
कैमोमाइल ही एक औषधी वनस्पती आहे. यामध्ये दाह आणि तणाव कमी करणारे दोन मुख्य गुण असतात. म्हणजे शरीरात सूज, जळजळ किंवा वेदना असल्यास ते कमी करण्यास मदत होते. उदा. पोटदुखी, त्वचेची जळजळ. ही चहा ताण, चिंता कमी करून शांत वाटायला मदत करते आणि त्यामुळे झोपही चांगली लागते. यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि मन शांत राहते. त्यामुळे ताण कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
‘फायटोमेडिसिन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कॅमोमाइलचा अर्क GABA रिसेप्टर्सशी संवाद साधतो, ज्यामुळे मेंदू शांत होतो. तणाव, चिंता आणि झोपेच्या समस्या यांचा संबंध उच्च रक्तदाबाशी आहे आणि या समस्या कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा प्रभावी मानला जातो. हा चहा शरीराला शांत करतो आणि आराम करण्यास मदत करतो. संशोधनात असे सुचवले आहे की कॅमोमाइलमध्ये रक्तदाब कमी करणारे गुणधर्म आहेत, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात.
ग्रीन टी
ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या अभ्यासानुसार, १२ आठवड्यांपेक्षा जास्त काळ ग्रीन टी प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब २.६ mmHg ने आणि डायस्टोलिक रक्तदाब २.२ mmHg ने कमी झाला. ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन-प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण, याचा परिणाम सेवनाच्या प्रमाणावर, नियमिततेवर अवलंबून असतो. काही संशोधनानुसार, दीर्घकाळ ग्रीन टी प्यायल्याने अधिक चांगले परिणाम मिळतात. संशोधनानुसार, ज्या लोकांना प्री-हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन आहे, त्यांच्यातील रक्तदाब कमी करण्यास ग्रीन टी मदत करू शकते.
काळी चहा
हिरव्या चहाप्रमाणेच, काळ्या चहामध्येही रक्तवाहिन्या शिथिल करण्यास मदत करणारे घटक असतात. काळ्या चहाच्या सेवनाचा संबंध कमी रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्याशी जोडला गेला आहे. एका अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांनी सहा महिने दररोज तीन कप काळया चहाचे सेवन केले. त्यांच्या सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाबात २ ते ३ mmHg ची घट झाली. यावरून असे सूचित होते की, नियमितपणे काळी चहा पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
