what to do if a snake bites instead of panic follow these methods| साप चावला तर काय करावे? घाबरण्याऐवजी 'या' पद्धतींचा करा अवलंब | Loksatta

साप चावला तर काय करावे? घाबरण्याऐवजी ‘या’ पद्धतींचा करा अवलंब

सर्पदंशावर योग्य उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सर्पदंशाच्या वेळी काही गोष्टींची योग्य वेळी काळजी घेतल्यास कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

साप चावला तर काय करावे? घाबरण्याऐवजी ‘या’ पद्धतींचा करा अवलंब
तुम्हाला किंवा जवळपासच्या कोणत्याही व्यक्तीला साप चावला तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. (photo credit: indian express)

तुम्हाला माहिती आहे का की भारतात दरवर्षी ५० हजार लोकांचा मृत्यू साप चावल्यामुळे होतो. सर्पदंशावर योग्य उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सर्पदंशाच्या वेळी काही गोष्टींची योग्य वेळी काळजी घेतल्यास कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सर्पदंशानंतर घाबरण्यापेक्षा काय करावे.

साप चावल्यानंतर हे काम लगेच करा

जर तुम्हाला किंवा जवळपासच्या कोणत्याही व्यक्तीला साप चावला तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी किंवा इमर्जन्सी कॉल करा. असे मानले जाते की पीडितेला अँटीवेनम औषध दिले पाहिजे. हे औषध सापाच्या विषाला ऊतींना जोडण्यापासून आणि रक्त, ऊती किंवा मज्जासंस्थेला गंभीर समस्या निर्माण करण्यापासून प्रतिबंधित करते. शक्य असल्यास सुरक्षित अंतरावरून सापाचे छायाचित्र काढा. यावरून साप ओळखल्यास उपचारात मदत होऊ शकते.

साप चावल्यानंतर कधीही घाबरू नका

सर्पदंशामुळे अनेक जण घाबरतात हे तुम्ही पाहिले असेल, पण अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. शांत झाल्यावर सर्वप्रथम तुमच्या कुटुंबीयांना कळवा. सापाच्या चावलेल्या भागात सूज येताच प्रथम अंगठी किंवा घड्याळ यांसारख्या वस्तू काढून टाका.

साप चावलेल्या भागाला साबण आणि पाण्याने धुवा

ज्या ठिकाणी साप चावतो तो भाग साबणाने आणि पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा. नंतर ते भाग स्वच्छ कापडाने झाकून टाका. साप चावलेल्या भागावर कोणतेही घाणेरडे कापड बांधू नका.

साप चावल्यानंतर या गोष्टी अजिबात करू नका

साप चावल्यानंतर त्याला अजिबात उचलू नका किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका.

साप चावल्यानंतर लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका, ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

जखम कधीही चाकूने कापू नका. यामुळे तुमची समस्या वाढू शकते

बरेच लोकं साप चावल्यानंतर विष शोषण्याचा प्रयत्न करतात, तथापि, असे कधीही करू नये.

असे मानले जाते की साप चावल्यावर जखमेवर बर्फ लावला जातो, परंतु असे कधीही करू नका.

(वरील माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
३ मिनिटांत चेहरा होईल ताजेतवाने, रोज झोपण्यापूर्वी करा ‘हा’ व्यायाम

संबंधित बातम्या

बदाम खाल्ल्याने ‘हे’ ४ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात! एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
मूगडाळीचे सेवन ‘या’ ८ आजारांमध्ये ठरू शकतं विषासमान! श्वास घेणं होऊ शकतं कठीण, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
‘या’ तीन आजारांमध्ये मनुके ठरतात तुमचे शत्रू! डॉक्टरांकडून जाणून घ्या काळे मनुके भिजवून खावे की सुके?
तोंडाची दुर्गंधी ठरू शकते ‘या’ जीवघेण्या आजारांचे लक्षण; वेळीच करा ‘हे’ उपाय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs PAK: “भारताचा आत्मविश्वास वाढू नये…” २६ वर्षापूर्वीच्या वादाला वसीम अक्रमच्या वक्तव्याने फुटले तोंड
पुणे: एसटी बसच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू; सोलापूर रस्त्यावर अपघात
व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा
विश्लेषण : कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?
IPL 2023 Auction: ५५ खेळाडूंवर लागणार करोडोंची बोली; तर दोन-दीड कोटीच्या गटात एकाही भारतीयाला स्थान नाही