Skincare Tips : चेहऱ्यावर मुरमे येणे ही एक शारीरिक समस्या आहेच; पण सोबतच ती मानसिक समस्यासुद्धा होऊ शकते. कारण- असे झाल्यावर आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण अस्वस्थ होतो. बाजारात विविध प्रकारच्या क्रीम्स, लोशन्स उपलब्ध आहेत; पण ही उत्पादने वापरल्याने त्वचेवर कोणताही रासायनिक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. पण, तुम्हाला माहीत आहे का? मुरमांवर (हार्मोनल पिंपल्सवर) नियंत्रण ठेवण्यासाठी तुमचा आहार तुम्हाला मदत करू शकतो.

१. तुमच्या आतड्याच्या आरोग्याचा तुमच्या त्वचेवर थेट परिणाम होतो आणि त्यामुळे योग्य पोषक घटक मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही हार्मोनल पिंपल्सचा त्रास असेल, तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा. हार्मोनल मुरमांचा सामना करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला आहार : तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हार्मोनल पिंपल्सच्या व्यवस्थापनात आहाराची मोठी भूमिका असते.

which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What is the Symptoms of Acid reflux
वारंवार आंबट ढेकर येतात का? मग तुम्हालाही असू शकतो Acid reflux; डॉक्टरांकडून जाणून घ्या कशी घ्यायची काळजी
bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
How To Make Curd Face pack for dry skin
Curd Face Pack : थंडीत त्वचा कोरडी दिसते? मग दह्याचा ‘हा’ फेसपॅक एकदा लावून तर बघा; सुंदर, मऊ आणि चमकणारी दिसेल तुमची त्वचा
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ

२. ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेले समृद्ध अन्न हार्मोनल पिंपल्सचे व्यवस्थापन करतात. हे पोषक घटक शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. आहारात यासाठी भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बियाणे, बदाम व अक्रोड समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थांतील उपयुक्त घटक केवळ जळजळ होण्याशीच लढत नाहीत, तर ते तुमच्या शरीरातील सेबम पातळीचे नियमन आणि हार्मोन्स संतुलित करण्यासही मदत करतात.

३. जस्तसमृद्ध अन्न – ओमेगा -3 फॅटी अॅसिडप्रमाणेच जस्त (झिंक) असलेले पदार्थदेखील हार्मोनल पिंपल्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. तसेच तुमच्या आहारात अॅव्होकॅडो, मांस, मासे, ऑयस्टर व बिया यांसारख्या झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करून पाहा.

४. Inositol मध्ये समृद्ध असलेले अन्न- Inositol हा साखरेचा एक प्रकार आहे, जो तुमच्या शरीरातही आढळतो. पेशींची वाढ आणि विकासासाठी ते महत्त्वाचे आहे. डॉ. शिवंती सांगतात की इनॉसिटॉल समृद्ध अन्न खाल्ल्याने हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते, ज्यामुळे पिंपल्स नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुमच्या त्वचेला सपोर्ट करण्यासाठी तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळे, खरबूज, शेंगा व संपूर्ण धान्य यांसारख्या इनोसिटॉल-समृद्ध पदार्थांचा समावेश करा. तसेच तज्ज्ञ आहारातून साखर आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला देतात. कारण- त्यामुळे तुमच्या त्वचेच्या स्थितीत लक्षणीय फरक पडू शकतो.

निरोगी, चमकदार त्वचेसाठी टिप्स :

तळलेले पदार्थ कमी करा- तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात जळजळ होऊ शकते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. तुमची त्वचा नियंत्रणात ठेवण्यासाठी तळलेले आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करा.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ – दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं जास्त सेवन करू नका, यामुळे तुमची इन्सुलिनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. अतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांमध्ये तुमच्या शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवण्याची क्षमतादेखील असते, ज्यामुळे अधिक ब्रेकआउट्स होतात.

तुमचे पोट आनंदी ठेवा – खराब पोट तुमच्या त्वचेवर गंभीरपणे परिणाम करू शकते. अतिसार किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या पाचक समस्यांनंतर पिंपल्सचा त्रास जास्त होतो. तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पचनावर लक्ष केंद्रित करा.

Story img Loader