What foods should eat for hypoglycemia : मधुमेहामध्ये रक्तातील साखरेशी संबंधित दोन अवस्था असतात. एक म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे(हाय शुगर), ज्याला हायपरग्लायसेमिया म्हणतात, आणि दुसरी म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे (लो शुगर), ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. या दोन्ही अवस्थांमध्ये रक्तातील साखरेची पातळी सामान्य राखणे खूप महत्त्वाचे आहे.
रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते तर साखरेची पातळी खूप जास्त झाल्यास शरीराच्या विविध अवयवांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा मधुमेही रुग्ण फळांमध्ये गोडवा नसतो या विचाराने ती खातात, पण तुम्हाला माहित आहे का की, फळांमध्येही नैसर्गिक गोडवा असतो आणि त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
एका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांनी अलीकडेच दिलेल्या माहितीनुसार, द्राक्षांसारख्या काही फळांमध्ये फायबरचे प्रमाण कमी आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. तर आता आपण कमी रक्तशर्करा असलेल्या लोकांसाठी कोणते पाच पदार्थ खाणे चांगले आहेत आणि उच्च रक्तशर्करा असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात, जाणून घेऊ…
रक्तातील साखर कमी होण्याची लक्षणे…
रक्तातील साखर कमी झाल्यामुळे (हायपोग्लायसेमिया) चक्कर येणे, थरथरणे, घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत, केळी किंवा द्राक्षे यांसारखे किमान १५ ग्रॅम कर्बोदके असलेले पदार्थ, किंवा अननसासारखे नैसर्गिक साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर झटपट वाढू शकते.
केळी
रक्तातील साखर कमी झाल्यास केळी खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण त्यात लवकर पचणारे कर्बोदके असतात. एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये सुमारे २५ ग्रॅम कर्बोदके त्यापैकी १८ ग्रॅम ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज यांसारख्या नैसर्गिक शर्करा असतात. केळीमध्ये सुमारे २ ग्रॅम फायबर असते, त्यामुळे ती सहज पचतात आणि ग्लुकोज शरीराला वेगाने पुरवतात. केळी कुठेही खायलाही सोपी असतात. पण, ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, त्यांच्यासाठी केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी आणखीन वेगाने वाढू शकते. त्यामुळे जास्त साखर असलेली केळी खाणे टाळा.
अननस
अननस हे एक रसरशीत फळ असून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) उच्च असतो, म्हणजेच ते रक्तातील साखर वेगाने वाढवते. त्याचा GI सुमारे ८२ असतो. एक कप अननसामध्ये अंदाजे २२ ग्रॅम कर्बोदके असतात, त्यापैकी १६ ग्रॅम नैसर्गिक साखर आणि २ ग्रॅम फायबर असते. ज्या लोकांची रक्तातील साखर जास्त आहे, त्यांच्यामध्ये अननसामुळे ती झपाट्याने वाढू शकते. पण, ज्यांची रक्तातील साखर कमी आहे त्यांनी रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी त्याचे सेवन केले पाहिजे. तुम्ही अननस कापून रेफ्रिजरेटर किंवा फ्रीझरमध्ये ठेवू शकता.
खजूर
खजूर नैसर्गिकरित्या गोड असतात, त्यांची चव कॅरमेलसारखी असते. एका खजुरामध्ये अंदाजे १८ ग्रॅम कर्बोदके असतात, त्यापैकी १६ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. खजूर लहान, खायला सोपे असतात. त्यांना फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. तुम्ही असचं किंवा बटरसोबत खाऊ शकता. ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. पण, ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे त्यांच्यामुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
द्राक्ष
द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते आणि ती लवकर पचतात, ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते. अर्धा कप द्राक्षांमध्ये सुमारे १५ ग्रॅम कर्बोदके असतात. द्राक्षे, मग ती लाल, हिरवी किंवा काळी असो. सहजपणे खाल्ली जाऊ शकतात. ज्यांची रक्तातील साखर कमी आहे त्यांच्यासाठी हे फळ वरदान आहे. पण, ज्यांची रक्तातील साखर जास्त आहे त्यांच्यासाठी ती तितकीच हानिकारक सुद्धा आहे.
सफरचंदाची चटणी
जेव्हा रक्तातील साखर कमी असते, तेव्हा त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी सफरचंदाची चटणी हा एक उत्तम पर्याय आहे. अर्धा कप बिनसाखरेच्या सफरचंद चटणीमध्ये सुमारे १५ ग्रॅम कर्बोदके असतात, त्यापैकी १२ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. तिच्या मऊ पोतमुळे ती पचायला सोपी जाते, विशेषतः जेव्हा तुम्हाला मळमळ होत असेल. ही चटणी ज्यांची रक्तातील साखर कमी आहे त्यांच्यासाठी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. तर ज्यांची रक्तातील साखर जास्त आहे त्यांच्यासाठी ती रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते.
