रात्री १२ ते ३ या काळात झोप न घेतल्याने होऊ शकतात निद्रानाशासह ‘हे’ आजार; जागरणाची सवय बदला नाहीतर…

रात्री जागरण केल्याने उद्भवणाऱ्या आजारांबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या…

sleeping disorder
रात्री झोप न घेतल्याने होणार होणार (फोटो – संग्रहित)

दिवसभर काम केल्याने शरीर थकते. अशा वेळी अवयवांना आराम मिळावा म्हणून झोप घेतली जाते. मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांना रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते. यामुळे बहुसंख्य लोक निद्रानाशाच्या त्रासाने त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. लोक आधी नाईलाज म्हणून रात्रभर जागत असत. पण आता त्यांना रात्रभर जागून पहाटे झोपायची सवय लागली आहे. यामुळे अनेकांचे निद्राचक्र (Sleeping cycle) बिघडले आहे. स्मार्टफोन्सच्या वापरामध्ये भर पडल्याने ही समस्या अधिक वाढत आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

रात्री १२ ते ३ या कालावधीमध्ये शरीरामध्ये सेरोटोनिन (Serotonin) हे हार्मोन तयार होत असते. मन शांत होऊन गाढ झोप लागावी यासाठी सेरोटोनिनची मदत होत असते. रॅपिड आय मूव्हमेंटवर (REM) देखील याचा प्रभाव पडत असतो. शरीराला या हार्मोनच्या उत्पादनाचे अन्य फायदे होत असतात. रात्र झोप न घेतल्याने याच्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो. परिणामी शरीरातील डोपामाइन (Dopamine hormone) हार्मोनचे प्रमाण कमी-कमी होत जाते. हार्मोनल असंतुलनामुळे शरीराला त्रास होतो. आराम न केल्याने मेंदू थकतो. अवयवांना विश्रांती न दिल्याने विविध आजार उद्भवण्याची शक्यता वाढते.

रात्रभर जागरण केल्याने होणारे विकार:

एंग्जायटी/ चिंता (Anxiety)

मानवी शरीराला रात्र आराम करायची सवय असते. रात्री न झोपल्याने ही सवय मोडली जाते. परिणामी शरीरावर एका प्रकारचा ताण येतो. यामुळे हार्मोनल असंतुलनदेखील होऊ शकते. असे झाल्यास एंग्जायटीची समस्या उद्भवते. या समस्येने त्रस्त असलेली व्यक्ती दु:खी, चिंताग्रत मनस्थितीमध्ये असते.

आणखी वाचा – World Oral Health Day: तोंडाची स्थिती पाहून आजाराचे निदान करता येते का? मौखिक आरोग्य आणि शरीर यांमध्ये काय संबंध असतो?

उच्च रक्तदाब (High BP)

रात्री जागरण केल्याने उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना अधिकचा त्रास होतो. रात्री विश्रांती न घेतल्याने शरीरावर येणाऱ्या दबावामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय विकार असे आजार संभवतात.

स्ट्रोक आणि हार्ट अटॅक (Stroke and Heart attack)

रात्री झोपेत असताना मेंदू, हृदय यांच्यासह सर्व अवयवांना आराम मिळत असतो. रात्री जागरण केल्याने हृदयावर अपेक्षेपेक्षा जास्त ताण येतो. यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता असते.

आणखी वाचा – World Oral Health Day 2023: आपल्या तोंडाशी संबंधित ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

नैराश्य (Depression)

झोप पूर्ण न झाल्याने अनेक मानसिक आजार बळावतात. यामुळे सेरोटोनिनचे उत्पादन कमी प्रमाणात होते. अनेकदा जागरण करणारा व्यक्ती नैराश्याने ग्रासलेला असतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 16:34 IST
Next Story
माऊथ फ्रेशनर नाही तर ‘या’ ३ गोष्टींमुळे तोंडातील दुर्गंधी होईल कमी: संशोधनातून झाले सिद्ध
Exit mobile version