BB CC DD Cream Difference : आजकाल बाजारात स्किन केअरपासून मेकअपचे अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. ज्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. पूर्वी फाउंडेशन, मॉइश्चरायझर, टोनर व सनस्क्रीन अशा वेगवेगळ्या क्रीम्सची गरज होती; पण आता एकाच क्रीममध्ये हे सर्व घटक असतात. त्यामुळे वेगवेगळ्या क्रीम्सची गरज लागत नाही. बाजारात BB, CC व DD क्रीम्ससारख्या अनेक क्रीम्स उपलब्ध आहेत, ज्या केवळ एकच नाही तर अनेक काम करतात. स्किन केअरपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा वापर होतो. पण, अनेकांना या क्रीम्सबद्दल नीटशी माहिती नसते. त्यामुळे BB, CC, व DD क्रीम्सचा नेमका वापर कशासाठी केला जातो, यात नेमका काय फरक आहेत ते समजून घेऊया.

BB, CC, व DD क्रीममध्ये फरक काय?

BB, CC व DD क्रीम या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत, ज्यांचा अनेक गोष्टींसाठी उपयोग केला जातो आणि त्याने त्वचेला असंख्य फायदे मिळतात.

BB क्रीम (BB Cream Full Form)

बीबी क्रीममधील ‘बीबी’ शब्दाचा ‘ब्यूटी बाम’ किंवा ‘ब्लेमिश बाम’ असा अर्थ आहे. एकाच फॉर्म्युल्यामध्ये बीबी क्रीम त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि मेकअपमध्ये त्याचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेला कव्हरेज, हायड्रेशन व सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते. नैसर्गिक दिसणाऱ्या रंगाला उजळ करणे, त्वचेचा रंग एकसमान करणे आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा व डाग कमी करणे, या उद्देशाने ती तयार करण्यात आली आहे.

Award Banner

सीसी क्रीम ( CC Cream Full Form)

सीसी क्रीममधील ‘सीसी’ (CC) चा अर्थ ‘कलर करेक्टर’ किंवा ‘कॉम्प्लेक्शन करेक्टर’ असा होतो. सीसी क्रीम्स बीबी क्रीम्ससारख्याच असतात; पण त्या त्वचेचा रंग एकसमान करण्यावर आणि रंग सुधारण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्या त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण देतात. कव्हरेज देण्याच्या दृष्टीने म्हणजेच लालसरपणा, काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्या कमी करण्यासाठी या क्रीम्स तयार केल्या गेलेल्या असतात.

डीडी क्रीम ( DD Cream Full Form)

डीडीचा अर्थ ‘डायनॅमिक डू-ऑल’ किंवा ‘डेली डिफेन्स’ असा होतो. BB व CC क्रीम्सच्या तुलनेत या क्रीमपासून अँटी एजिंग फायदे, स्किन टायटनिंग व तेलकटपणा कमी करणे, असे अधिक फायदे मिळतात.