scorecardresearch

विनायक चतुर्थीनिमित्त श्री गणेश देवाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास ठेवतात आणि विधीवत पूजा देखील करतात. तसेच विनायक चतुर्थीच्या दिवशी जर मनोभावे पूजा केली गेली तर विशेष फळ प्राप्त होतं.

श्रीगणेशाची पूजा करताना त्यांना दुर्वा नक्की समर्पित करा. (photo credit: file photo)

६ मार्च रोजी रविवारी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्याच्या चतुर्थीला हा उत्सव साजरा केला जाईल. या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास ठेवतात आणि विधीवत पूजा देखील करतात. तसेच विनायक चतुर्थीच्या दिवशी जर मनोभावे पूजा केली गेली तर विशेष फळ प्राप्त होतं. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात…..

श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

गणपती बाप्पाला दुर्वा अति प्रिय आहे. श्रीगणेशाची पूजा करताना त्यांना दुर्वा नक्की समर्पित करा. असं केल्याने भगवान गणेशाचा आशीर्वाद भक्तांना मिळतो.

धन, संपत्ती, वैभव, सुख, समृद्धी इत्यादींची इच्छा असणाऱ्यांनी श्री गणेशाला शमीची पाने अर्पण करावीत. यामुळे श्रीगणेश लवकरच प्रसन्न होतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.

पुजेच्या वेळी गणपतीला लाल सिंदूरचा टिळा लावा. असे केल्याने श्रीगणेश लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात.

नोकरीत यश मिळवण्यासाठी किंवा भविष्यातील प्रगतीसाठी घरात उंदरावर बसलेल्या गणेशाची मूर्ती ठेवा किंवा प्रतिमा आणून त्याची पूजा करा.

मोदक भगवान गणेशाला अति प्रिय आहे. त्यामुळे बुधवारच्या दिवशी श्रीगणेशाला मोदकांचं नैवैद्य नक्की दाखवा.

भगवान गणेशाला लाल फूल समर्पित करावं. जर लाल फूल समर्पित करणे शक्य नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही फूल चढवू शकता. फक्त या गोष्टीची काळजी घ्या की भगवान गणेशाच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर केला जाऊ नये.

यासोबतच ‘सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥ ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करा.

(टीप: या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. वरील उपाय करताना ज्योतिषशास्त्रांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When is vinayak chaturthi do this upay to please shri ganesha scsm

ताज्या बातम्या