Ajwain Water Benefits: आयुर्वेदानुसार, जेवणात वापरला जाणारा ओवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो, तो प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. ओवा जेवणाचा सुगंध आणि चव तर वाढवतोच; पण अनेक आजार बरे करण्यासही मदत करतो. ओव्यामध्ये प्रथिने, फायबर, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. अशा ओव्याचे शरीरासाठी असंख्य फायदे आहेत, जे फार कमी लोकांना माहीत आहेत.

ओव्याच्या पाण्याचे फायदे

  • ओव्याचे पाणी शरीरासाठी केवळ एकाच प्रकारे नाही, तर अनेक प्रकारे फायदेशीर आहे. ते पचनसंस्था सक्षम ठेवण्यास मदत करते, चयापचय क्रिया सुधारते, वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे, सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते, हंगामी संसर्ग कमी करते आणि महिलांमधील पोटदुखी कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे. तर, वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी कसे प्यावे हे जाणून घ्यावे.
  • वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी बनवणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम एक चमचा ओव्याचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी ओव्यासह गरम करा. नंतर ते गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी जाळण्याची क्षमता मिळविण्यास मदत होते.
  • रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. वजन कमी करण्यासाठी तुमची इच्छा असल्यास, तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासानेदेखील ओव्याचे पाणी पिऊ शकता.
  • ओव्याचे अति सेवन होणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यामुळे एक-दोन चमच्यांपेक्षा जास्त ओव्याचे सेवन करू नका.
  • वजन कमी करण्यासाठी किमान १५ ते २० दिवस ओव्याचे पाणी प्या. तुम्ही त्याचे नियमित सेवन करीत राहिल्यास त्याचा परिणाम दिसून येईल.

ओव्याच्या पाण्याचे इतर काही फायदे

  • अनेकांना रात्री झोप लागत नाही किंवा भूक लागते. काही लोक अशा वेळी तणावपूर्ण आहार घेतात. या सगळ्यामुळे लोकांचे वजन वाढते आणि त्यांना पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ओवा पाण्यात टाकून, ते पाणी उकळून पिणे फायदेशीर ठरू शकते. हे पाणी केवळ पोट साफ करीत नाही, तर जीवनशैलीशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास मदत करते.
  • चांगली झोप येण्यासाठी तुमची पचनक्रिया आणि हार्मोनल आरोग्य दोन्ही चांगले असणे गरजेचे आहे. ओव्याचे पाणी प्यायल्यावर त्याचा अर्क पोटातील अन्न पचवतो. त्यामुळे तुमची झोप खराब होत नाही आणि नंतर तुमचे हार्मोनल हेल्थ हार्मोनल चांगले राहते आणि त्याचा परिणाम तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या शरीरावर जाणवेल.
  • शरीराचे डिटॉक्सिफिकेशन झाल्यावर त्वचेची छिद्रे स्पष्ट होतात. त्यामुळे आपली त्वचा आतून स्वच्छ आणि सुंदर दिसते. त्याशिवाय ओवा अँटीबॅक्टेरियल आहे, ज्यामुळे मुरमे आणि पुरळ कमी होते. अशा प्रकारे तुमची त्वचा सुंदर दिसते. त्यामुळे या सर्व कारणांसाठी तुम्ही झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्यावे.
  • ओवा पाण्यात उकळून, ते पाणी प्यायल्यास पोट साफ करण्यास मदत करते. या पाण्यामुळे तुमची चयापचय क्षमता वाढते आणि पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. ओव्यात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि चयापचयाचा दर वाढवतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून, ‘लोकसत्ता’ याची पुष्टी करीत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)