हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथीनंतर नवीन महिना सुरू होतो. अशा प्रकारे पौष महिन्याच्या अमावास्येनंतर १ फेब्रुवारी पासून माघ महिना सुरू होईल. तर त्याचवेळी नवीन माघ महिना सुरू झाल्यावर प्रमुख उपवास सण साजरे केले जातात. चला तर मग माघ महिन्यातील सर्व उपवासाच्या सणाच्या तारखा जाणून घेऊयात
माघ महिन्याचे सण पुढीलप्रमाणे आहेत-
१ फेब्रुवारीला मौनी अमावस्या आहे.




२ फेब्रुवारीला माघ अमावस्या आहे.
२ फेब्रुवारीपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होत आहे.
४ फेब्रुवारीला विनायक चतुर्थी आहे.
५ फेब्रुवारीला वसंत पंचमी आणि सरस्वती पूजा आहे.
६ फेब्रुवारीला स्कंद षष्ठी आहे.
७ फेब्रुवारीला रथ सप्तमी आणि नर्मदा जयंती आहे.
७ फेब्रुवारीला भीष्म अष्टमी आहे.
8 फेब्रुवारीला मासिक दुर्गाष्टमी आणि मासिक कार्तिगाई आहे.
१० फेब्रुवारीला रोहिणी उपवास आहे.
१२ फेब्रुवारीला जया एकादशी आहे. धार्मिक पंडितांचे मानायचे झाल्यास, एकादशीच्या रात्री जागरण केल्याने साधकाला भगवंताचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी भात खावा. तसेच उपवास करणार्यांनी त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार निर्जला किंवा फलहार व्रत करू शकतात.
१३ फेब्रुवारीला कुंभ संक्रांती आणि भीष्म द्वादशी आहे.
१४ फेब्रुवारीला प्रदोष व्रत आहे.
१६ फेब्रुवारीला गुरु रविदास आणि ललिता जयंती आहे.
१६ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे.
१७ फेब्रुवारीला वासुदेव बळवंत फडके पुण्यादिन
१९ फेब्रुवारीला (तारखेप्रमाणे) छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे.
२० फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी आहे.
२७ फेब्रुवारीला भागवत एकादशी आणि मराठी राजभाषा दिन आहे.
१ मार्चला महाशिवरात्री आहे.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)