मैत्री हे एक सुंदर नातं आहे, जे तुम्हाला जन्मापासून मिळत नाही, ते आपण स्वतःसाठी निवडतो. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचं नातं खूप खास असतं. खरा मित्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो. तुम्ही तुमची स्वप्ने आणि गुपिते खर्‍या मित्रासोबत शेअर करू शकता, ज्याबद्दल तुमच्या जवळच्या लोकांनाही माहिती नसते. ही मैत्री साजरी करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅराग्वेमध्ये फ्रेंडशिप डे सुरू झाला. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव प्रथम १९५८ मध्ये येथे मांडण्यात आला, त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी ३० जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. म्हणूनच आजही ३० जुलैला अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण भारत, बांग्लादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांसारखी राज्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. ओबरलिनमध्ये हा दिवस दरवर्षी ८ एप्रिल रोजी साजरा केला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will friendship day 2022 be celebrated in india this year give your dear friend a special gift pvp
First published on: 02-08-2022 at 11:23 IST