Refined Oil Side Effects : तुमच्या शरीरासाठी केवळ दारू, साखर किंवा प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) हेच नुकसानकारक नाही, तर दररोज दिवसातून दोनदा स्वयंपाकासाठी वापरली जाणारी एक गोष्टही तितकीच घातक आहे. ती गोष्ट म्हणजे रिफाइंड तेल (Refined Oil) आणि वनस्पती तूप (डालडा).

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांच्या मते, स्वयंपाकात या तेलांचा वापर केल्याने तुमचे हृदय, यकृत (लिव्हर) आणि मेंदूला खूप मोठे नुकसान पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोण-कोणत्या प्रकारचे तेस तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि त्यांच्याऐवजी स्वयंपाकात कोणत्या तेलाचा वापर केला पाहिजे?

स्वयंपाकात कोणते तेल वापरणे टाळावे?

रिफाइंड तेल: डॉ. सलीम झैदी सांगतात की, स्वयंपाकासाठी सनफ्लॉवर तेल (सूरजमुखी), सोयाबीन तेल, राइस ब्रान तेल, कॅनोला तेल आणि वनस्पती तूप वापरणे टाळले पाहिजे. कारण अशा तेलांच्या पॅकेजिंगवर ‘हेल्दी हार्ट’ (हृदयासाठी चांगले) असे दावे केले जात अेसले, तरी कोणत्याही तेलाचा शरीरावर होणारा परिणाम हा त्याच्या प्रक्रियेवर (प्रोसेसिंग), त्यातील फॅटी ॲसिडच्या प्रमाणावर आणि त्याच्या वापराच्या प्रमाणावर अवलंबून असतो.

प्रक्रियेदरम्यान होणारे नुकसान: रिफाइंड तेल तयार करताना बियांना (Seeds) २०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर गरम केले जाते. जास्त तापमान आणि रासायनिक प्रक्रियेमुळे तेलाच्या मूळ रचनेत बदल होतो. परिणामी, बियांमधील सर्व पोषक घटक नष्ट होतात आणि तेलामध्ये शरीरात जळजळ/सूज (Inflammation) निर्माण करणारे घटक वाढतात. यामुळे हृदयविकार, मधुमेह (डायबिटीज) आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो.

वनस्पती तूप किंवा डालडा: जर तुम्ही स्वयंपाकासाठी वनस्पती तूप किंवा डालडा वापरत असाल, तर ते रिफाइंड तेलापेक्षाही अधिक धोकादायक आहे. यामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात ‘ट्रान्स फॅट्स’ (Trans Fats) असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, ट्रान्स फॅट्सचा वापर सिगारेटइतकाच धोकादायक असू शकतो आणि हा हार्ट अटॅकचा सर्वात मोठा मुख्य कारण ठरू शकतो.

स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?

डॉक्टर सलीम झैदी यांच्या मते, स्वयंपाकासाठी तुम्ही गायीचे/म्हशीचे देशी तूप किंवा कच्ची घाणीचे मोहरीचे तेल (Mustard Oil) वापरले पाहिजे. आहारातील तेलामध्ये हा महत्त्वाचा बदल केल्यास तुमचे हृदय, लिव्हर आणि मेंदू निरोगी राहण्यास मदत होईल.