5 Foods That Are Proven to Improve Brain Health : फक्त चांगला आहार घेतल्याने शरीर निरोगी राहण्यासच मदत होते असे नाही. आपण रोज खात असलेले काही पदार्थ मेंदूचे आरोग्य आणि त्याचे सामान्य कार्य सुरळीत ठेवण्यासही मदत करू शकतात. एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये, डॉक्टर सौरभ सेठी यांनी अशा पाच पदार्थांबद्दल सांगितले आहे जे त्यांच्या मते स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि मेंदूच्या एकूण आरोग्याला मदत करू शकतात. डॉक्टर सेठी हे बोर्ड-प्रमाणित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आहेत, ज्यांनी हार्वर्ड, स्टॅनफर्ड आणि एम्स (AIIMS) येथे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या यादीत ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, कोलीन, मॅग्नेशियम, झिंक, तांबे आणि वनस्पतीजन्य संयुगे यांसारखी पोषक तत्वे पुरवणाऱ्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

तुमच्या आहारात समाविष्ट करावेत असे मेंदूसाठी अनुकूल ५ पदार्थ

१. अक्रोड

पहिला पदार्थ म्हणजे अक्रोड. क्रोड ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे गुणधर्म उत्तम स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीला मदत करू शकतात. ही पोषक तत्त्वे मेंदूतील न्यूरॉन्सचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात. तसेच, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि शरीरातील दाहामुळे होणारे नुकसान कमी करण्यासही त्यांची मदत होऊ शकते.

२. अंडी

यानंतर अंड्यांचा समावेश होतो. अंड्यांमधून प्रथिने आणि कोलीन मिळते. मेंदूतील स्मरणशक्ती, नवीन गोष्टी शिकणे आणि संवादाशी संबंधित ॲसिटिलकोलीन या न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीसाठी कोलीन महत्त्वाचे असते. त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी कोलीनची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

३. चरबीयुक्त मासे

सॅल्मनसारखे चरबीयुक्त माशांचा देखील या यादीत समाविष्ट होतो. कारण – ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असतात, ज्यात डीएचए (DHA) आणि ईपीए (EPA) यांचा समावेश होतो. डीएचए (DHA) हा मेंदूच्या पेशींच्या पडद्यांचा एक प्रमुख संरचनात्मक घटक आहे आणि जो निरोगी, कार्यक्षम न्यूरॉन्सना आधार देण्यास मदत करतो.

४. भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक आणि तांबे असतात. झिंक मज्जासंकेतांना आधार देते, मॅग्नेशियम मेंदू आणि मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि मानसिक कार्यक्षमतेला आधार देण्यास मदत करू शकते.

५. बेरी

पाचवा पदार्थ म्हणजे बेरी. बेरीमध्ये पॉलीफेनॉल आणि अँथोसायनिन असतात. ही संयुगे मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दाह कमी करण्यास मदत करू शकतात. यामुळे वयानुसार होणारी बौद्धिक क्षमता घट मंदावण्यास मदत होऊ शकते.

त्यामुळे एकत्रितपणे पाहता डॉक्टरांच्या यादीतील पाचही पदार्थ अशा पोषक घटकांवर आणि वनस्पती संयुगांवर लक्ष केंद्रित करतात, जे त्यांच्या मते, स्मरणशक्ती आणि शिकण्यापासून ते निरोगी चेतासंस्थेच्या कार्यापर्यंत, मेंदूच्या कार्यांच्या विविध पैलूंना आधार देऊ शकतात.