फळे आणि भाज्या बर्‍याच काळासाठी फक्त रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या जाऊ शकतात. फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने ताजी राहतात. तसेच खराब होण्याची शक्यता कमी असते. अनेकदा अनेकजण आठवडाभराच्या भाज्या किंवा फळे आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका कमी होतो.

पण तुम्हाला माहीत आहे की सगळीच फळे फ्रीजमध्ये ठेवली जात नाहीत. अशीही काही फळे आहेत जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. काही हंगामी फळे अशी असतात ती फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव बदलते,चला जाणून घेऊया अशी कोणती फळे आहेत जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यावर परिणाम होतो.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

केळी फ्रिजमध्ये ठेऊ नये

फ्रीजमध्ये केळी ठेवल्याने परिणाम बदलू शकतो: केळी उप-उष्णकटिबंधीय भागात उगवते जेथे हवामान उबदार असते. केळीवर जास्त उष्णतेचा परिणाम होत नाही. जर तुम्हाला केळी काही दिवस साठवायची असतील आणि फ्रीजमध्ये ठेवायची असतील तर ते थंड होण्याने लवकर खराब होतील. फ्रीजच्या थंडीमुळे केळी काळे होतात, त्यामुळे ते लवकर सडू लागतात.

फ्रीजमध्ये संत्री ठेवण्याची गरज नाही

संत्री फ्रीजमध्ये ठेवू नये, विशेषतः हिवाळ्यात. सायट्रिक ऍसिड असलेली फळे आणि भाज्या फ्रीजची थंड हवा सहन करू शकत नाहीत. फ्रीजमध्ये संत्री ठेवल्यास थंडीची तक्रार होऊ शकते. संत्र्याप्रमाणे लिंबू आणि मोसमी फ्रिजमध्ये ठेवू नये.

सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका

सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नयेत. सफरचंदांमध्ये सक्रिय एंजाइम असतात, ज्यामुळे सफरचंद थंड ठिकाणी जलद पिकू शकतात. सफरचंद उन्हाळ्यात थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यास ते कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा.

अॅव्होकॅडो फ्रीजमध्ये ठेवू नका

अॅव्होकॅडोमध्ये फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा बाहेरचा भाग कडक होतो आणि आतील भाग खराब होऊ लागतो.

ही फळे फ्रीजमध्येही ठेवू नका

उन्हाळ्यात पीच, आलू बुखारा, चेरी ही हंगामी फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यांची चव मंद होते.