Winter Healthy Food: लाडूचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं ना… हिवाळ्यात आपल्या देशात खास वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. तीळ, मेथी, डिंक आणि इतर प्रकारचेसुद्धा. सर्व प्रकारच्या लाडूमध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश असतोच. मात्र काहीवेळा खबरदारी न घेतल्यास ते हानिकारक ठरू शकतात. ते बनवताना आणि खातानाही काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. तेव्हा याबाबत नेमकी काय काळजी घ्यावी हे सविस्तर जाणून घेऊ…
आपल्या शरीराचे तापमान प्रतेयक ऋतूमध्ये स्थिर राहते. ३७ ते ३८ अंश सेल्सिअस. हिवाळ्यात जेव्हा बाहेरचे तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस पर्यंत खाली येते, तेव्हा शरीर उबदार राहण्यासाठी संघर्ष करते. योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली नसेल तर शरीराचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत थंडीच्या दिवसात विशिष्ट प्रकारचे लाडू खाल्ले जातात. लाडू हा अतिशय पौष्टिक पदार्थ मानला जातो, जेव्हा तो विशिष्ट पद्धतीने आणि आरोग्याला फायदा देणाऱ्या पदार्थांपासून बनवले जातात.
- दररोज एक लहान लाडू पुरेसा आहे. यापेक्षा जास्त सहसा आवश्यक नसते.
- सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारपर्यंत लाडू खाणे उत्तम.
- तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यालाही लाडू खाऊ शकता. रात्रीच्या वेळी लाडू खाणे पचनास जड पडू शकते.
- फक्त एकाच प्रकारे लाडू खाऊ नका. ३-४ वेगवेगळे लाडू बनवा आणि आलटून पालटून खा.
- हे लाडू खाताना दूध पिण्याची गरज नाही.
- लाडू खाल्ल्याने गॅस, पोटदुखी, पित्त अशा समस्या उद्भवत असतील तर ते खाऊ नका.
- ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे त्यांनी हे लाडू खाऊ नये.
लाडू बनवताना काय चुका होतात?
- लाडू बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात तूप वापरले जाते. त्यामुळे ते उच्च-कॅलरीयुक्त अन्न बनते.
- साखरेऐवजी गुळाचा वापर केल्याने लाडू अधिक आरोग्यदायी बनतो, त्यामुळे डायबिटीज असलेले लोकही तो खाऊ शकतात.
- साखरेची पातळी अनियंत्रित असली तरीही अशे लाडू खा.
- लिंव्हर आणि किडनी अशा समस्या असलेल्या लोकांनी लाडू खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- बरेच लोक बाहेरून विकत खवा किंवा इतर पदार्थ घेतात. मात्र ते भेसळयुक्त असू शकतात.
- बऱ्याचदा दूध घालून लाडू बनवणे टाळले जाते, कारण दूधाचा वापर केल्याने लाडू जास्त काळ टिकत नाहीत. तर तूप वापरल्याने ते जास्त काळ टिकतात. मात्र दुधापासून बनवलेल्या लाडूमध्ये तूपापासून बनवलेल्या लाडवांपेक्षा कमी कॅलरीज असतात. शिवाय आणखी गोड पदार्थांची आवश्यकता कमी भासते.
साखर आणि गुळाऐवजी काय वापरावे?
जर तुम्हाला हे लाडू खाल्ल्यानंतरही तुमच्या साखरेचे प्रमाण वाढू नये असे वाटत असेल तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी साखर आणि गूळ दोन्ही वापरणे टाळावे.
लाडूंना गोड करण्यासाठी मनुके, अंजीर किंवा खजूर यांच्या पेस्टचा वापर करावा. जरी ते साखर किंवा गूळासारखे गोड नसले तरी ते आरोग्यासाठी फआयदेशीर असतात.
ड्रायफ्रुट्सच्या लाडूंमध्ये साखर किंवा गूळ घालण्याची गरज नाही.
तिळाचे लाडू
तिळाच्या लाडूसाठी गूळ वापरला जातो. तीळ शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी राखण्यास मदत करतात. तसंच डायबिटीजच्या रूग्णांसाठी ते फायदेशीर आहेत. तिळातील कॅल्शियममुळे ते हाडांसाठी उपयुक्त आहेत. भरपूर फायबर असल्याने ते पचनास देखील मदत करतात. लिव्हरसाठी तसंच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासही मदत करतात.
लिव्हर किंवा किडनीच्या समस्या असलेल्यांनी तिळाचे लाडू खावू नयेत.
ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या आहे, त्यांना यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
डायबिटीजच्या रूग्णांनीही तिळाचे लाडू गुळासोबत खाऊ नयेत.
लिव्हरच्या समस्या असलेल्या रूग्णांनी ते खाऊ नयेत, कारण व्हिटॅमिन केमुळे रक्त गोठण्याचा धोका असतो.
मेथीचे लाडू
मेथईचे लाडू डायबिटीजच्या रूग्णांसाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र हे लाडू आकाराने लहान असावेत. मेथीचे दाणे व्यवस्थित भिजवलेले किंवा भाजलेले नसतात. ते रात्रभर पाण्यात भिजवून आणि नंतर मंद आचेवर भाजून तयार करावेत.
मेथी उष्ण असते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस, पित्त आणि रक्तातील साखर कमी होऊ शकते.
जास्त पित्त, गॅस आणि पोटफुगीची समस्या असल्यास हे लाडू कमी प्रमाणात खावे.
साखरेचे प्रमाण कमी असेल तर ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अळशीचे लाडू
अळशी ओमेगा-३ फॅटी अॅसिडचा उत्तम स्त्रोत आहे. ते हृदयासाठी चांगले असतात. यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. कच्च्या अळशीचे सेवन केल्यास ते पचनास जड असते.
जास्त फॉस्फरसमुळे किडनीच्या रूग्णांना नुकसान होऊ शकते.
जेव्हा शरीरात फॉस्फरसचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा हाडांमधये कॅल्शियमचे प्रमण कमी होऊ लागते. त्यामुळे हाडांचा कमकुवतपणा वाढतो.
ड्रायफ्रुट्सचे लाडू
हे आरोग्यदायी असतात, पण पचनास खूप जड असतात. ते जास्त खाल्ल्याने फायदेशीर अशतात हा समज चुकीचा आहे. जास्त प्रमाणात हे लाडू खाल्ल्याने फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे लाडू कमी खा.
कोलेस्ट्रॉलची पातळी गंभीर असेल किंवा पचनास त्रास होत असेल तर हे लाडू खाणे टाळावे.
