High Uric Acid: जर तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी जास्त असेल आणि तुम्ही डाळी खाणे पूर्णपणे बंद केले असेल तर हे नक्की वाचा. बऱ्याचदा जास्त युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण असलेले लोक असं गृहीत धरतात की सर्व डाळी हानिकारक आहेत. मात्र तज्ज्ञ असे मानत नाहीत. आहारतज्ज्ञ सागंतात की, जर योग्य डाळी निवडल्या आणि योग्य प्रमाणात घेतल्या तर डाळी पूर्णपणे सोडून न देता आहाराचे व्यवस्थापन करता येते. युरिक अ‍ॅसिड हे शरीरात तयार होणारे एक टाकाऊ घटक आहे. ते किडनीद्वारे बाहेर टाकले जाते. जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात तयार होऊ लागते किंवा किडनी ते योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा त्याचे प्रमाण वाढते. याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. त्यामुळे सांधेदुखी, गट आणि किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

सर्व प्रकारच्या डाळी धोकादायक असतात का?

आहारतज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असेल तर सर्व डाळी टाळे आवश्यक नाही. महत्त्वाचे म्हणजे डाळींमधील प्युरिनचे प्रमाण जास्त असते. प्युरिनचे विघटन होऊन ते युरिक अ‍ॅसिड बनते, त्यामुळे प्युरिनचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ हानिकारक असू शकतात. आहारतज्ज्ञ सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीचे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण खूप जास्त असेल म्हणजेच ८ मिलीग्रॅम डेसीएलपेक्षा जास्त असेल, तर त्यांनी खाण्याबाबत सावधगिरी बाळगावी आणि कमी प्युरिन असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

सर्वात आगरोग्यदायी डाळ कोणती?

पिवळ्या मूगाच्या डाळीमध्ये प्युरिनचे प्रमाण सर्वात कमी असते. त्यामध्ये २५ ते ३५ मिलीग्रॅम प्युरिन असते. ते दररोज मर्यादित प्रमाणात सेवन करता येऊ शकते. त्यामुळे मूग डाळ युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्यांसाठी सुरक्षित आहे.

कोणत्या डाळी कमी प्रमाणात खाव्यात?

मसूर, तूर आणि हिरव्या डाळींमध्ये ३५ ते ५० मिलीग्रॅम प्युरिन असते. ते आठवड्यातून तीन ते चार वेळा खाऊ शकता. मात्र, ते शिजवण्यापूर्वी ६ ते ८ तास भिजवून ठेवावे. दरम्यान चवळी, हिरवे मूग, हरभरा आणि मसूर यामध्ये ६० ते ७५ मिलीग्रॅम प्युरिन असते. ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाऊ शकता.

कोणत्या डाळी खाऊ नये?

चणे, राजमा आणि काळे चणे यामध्ये प्युरिनचे प्रमाण ७५ ते ९० मिलीग्रॅम पर्यंत असते. दर १० ते १५ दिवसांनी एकदाच हे खाण्याचा सल्ला दिला जातो. दुसरीकडे सोयाबीन आणि सोया चंक्समध्ये प्युरिनचे प्रमाण सर्वाधिक असते. जवळपास १२० ते १४० मिलीग्रॅम. ज्यांच्या शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त आहे त्यांनी ते हे पूर्णपणे टाळावे.