Liver Kidney Cleaning Vegetable: किडनी आणि लिव्हर हे निरोगी शरीर राखण्यास मदत करतात. ते रक्त आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.पण यासाठी आधी लिव्हर आणि किडनी निरोगी असणे महत्वाचे आहे. यासाठी आपल्याला आहारात शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोली, लसूण आणि बीट यांसारख्या भाज्यांचा नक्कीच समावेश केला पाहिजे. यामध्ये अशी पोषक तत्वे असतात जे किडनी आणि लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
हेल्थलाइन या यूएसए वेबसाइटच्या एका अहवालानुसार, आपण आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे, जे किडनी आणि लिव्हर निरोगी ठेवण्यास आणि त्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगल्या भाज्या कोणत्या?
ब्रोकोली आणि क्रुसिफेरस भाज्या – तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोली, फुलकोबी, फ्लॉवर, बोक चॉय आणि केल यांसारख्या क्रुसिफेरस भाज्यांचा समावेश केला पाहिजे. या भाज्या विशेषतः महत्त्वाच्या आहेत कारण त्यामध्ये ग्लुकोसिनोलेट्स असतात, जे लिव्हरला शरीरातील अनेक पदार्थांवर प्रक्रिया करण्यास आणि त्यांचे चयापचय करण्यास मदत करतात. या भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. त्यांच्या नियमित सेवनाने रक्तातील चरबी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी देखील या भाज्या चांगल्या मानल्या जातात. या भाज्यांचा तुमच्या आहारात दररोज आणि दीर्घकाळासाठी समावेश करणे महत्त्वाचे आहे.
लसूण – लसूण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. लसणामध्ये ॲलिसिन आणि इतर मेटाबोलाइट्ससारखी सेंद्रिय सल्फर संयुगे असतात. हे घटक अँटिऑक्सिडंट आणि अँटि इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असतात. ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास आणि पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करतात. लिव्हर सतत विविध चयापचय उत्पादने, औषधे, अल्कोहोल आणि इतर पदार्थांच्या संपर्कात असते. वाढलेल्या ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे लिव्हरच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. लसूण खाल्ल्याने शरीराला निरोगी चयापचय वातावरण राखण्यास मदत होते.
बीटरूट – तुमच्या रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात बीटरूटचा समावेश नक्की करा. बीटरूटमध्ये नैसर्गिक बिटालिन्स आणि नायट्रेट्स चांगल्या प्रमाणात असतात. बिटालिन्समुळे बीटरूटला लाल रंग येतो आणि ते शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहेत. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, बीटरूटमुळे चयापचय आरोग्य आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. किडनी आणि लिव्हर या दोन्ही अवयवांच्या कार्यासाठी स्थिर रक्तप्रवाहावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. रक्ताभिसरण कमी असणे, अनियमित रक्तदाब किंवा चयापचयाच्या समस्यांमुळे किडनी आणि लिव्हरला त्रास होतो. पण बीटरूटमुळे तुमची चयापचय क्रिया सुरळीत राहते.
