White Discharge Treatment : योनीतून होणार स्त्राव हा योनीमार्गाचे संसर्गापासून संरक्षण करतो. हा स्त्राव म्हणजे व्हाईट डिस्चार्ज, जो नैसर्गिक असतो पण त्याचे प्रमाण वाढले की तो समस्याचे कारण ठरतो. व्हाईट डिस्चार्जला शास्त्रीय भाषेत ल्युकोरिया (Leucorrhoea) असे म्हणतात. पिरीएड्सदरम्यान व्हाईट डिस्चार्ज होणे सामान्य आहे, पण जर एरवीसुद्धा तुम्हाला हा त्रास अधिक प्रमाणात सहन करावा लागत असेल तर मात्र हे धोक्याचे लक्षण ठरू शकते.

व्हाईट डिस्चार्जचा रंग पिवळा, हिरवा किंवा राखाडी असेल किंवा त्याचा तीव्र वास येत असेल, गुप्तांगात खाज सुटत असेल, जळजळ होत असेल तर समस्येचं गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पण, काही घरगुती उपाय करूनही तुम्ही या त्रासापासून आराम मिळवू शकता, यासाठी आहारतज्ज्ञ श्वेता शाह यांनी दोन उपाय सुचवले आहेत ते जाणून घेऊ…

व्हाईट डिस्चार्जवर घरगुती उपाय काय?

१) अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या, तो अर्धा कप पाणी किंवा दुधात मिसळून प्या. हा उपाय आठवड्यातून फक्त दोनच दिवस करायचा आहे.

२) एक चमचा धणे घेऊन ते एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा, यानंतर सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. धणे नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देतात तसेच हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात.

व्हाईट डिस्चार्जचा त्रास रोखण्यासाठी काय काळजी घ्याल?

योनीमार्गातील व्हाईट डिस्चार्जची समस्या रोखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचे आहे. विशेषत: स्वच्छतेची काळजी घ्यावी. योगीमार्ग स्वच्छ करताना कोणताही केमिकल युक्त साबण, लिक्विड, जेलचा वापर करू नका. या गोष्टींमुळेसुद्धा संसर्गाचा धोका वाढतो. स्वच्छता राखण्यासाठी योनी फक्त पाण्याने स्वच्छ करा. व्हाईट डिस्चार्ज रोखण्यासाठी महिलांनी आहारात ताक जास्त प्रमाणात सेवन करावे, यामुळे शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढतात.