scorecardresearch

तरुण वयात केस पांढरे होतात? तर नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

महागडी उत्पादने वापरूनही पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय अवलंबवा.

केस काळे करण्यासाठी ५ नैसर्गिक घरगुती उपाय करा. (photo credit: file photo)

केस अकाली पांढरे होणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे, २० ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांनाही याची खूप काळजी वाटते. काहीवेळा यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात, परंतु सध्याच्या युगातील बदलती जीवनशैली आणि अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी हेही यामागे महत्त्वाचे कारण आहे. अनेक वेळा महागडी उत्पादने वापरूनही पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला काही घरगुती उपाय अवलंबावे लागतील, ज्याच्या मदतीने केस नैसर्गिकरित्या काळे करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात….

केस काळे करण्यासाठी ५ नैसर्गिक घरगुती उपाय

आवळा पावडर

सर्व प्रथम, एक कप आवळा पावडर घ्या आणि ती राख होईपर्यंत लोखंडी भांड्यात गरम करा. नंतर त्यात ५०० मिली खोबरेल तेल मिसळा आणि मंद आचेवर २० मिनिटे गरम करा. थंड झाल्यावर २४ तास हे मिश्रण असेच राहू द्या. नंतर हवाबंद बाटलीत बंद करा. आठवड्यातून दोनदा या तेलाने केसांना मसाज करा.

कढीपत्ता

एक घड कढीपत्ता घेऊन त्यात २ चमचे आवळा पावडर आणि ब्राह्मी पावडर मिसळून बारीक करा. हा हेअर मास्क केसांवर अशा प्रकारे लावा की तो मुळांपर्यंत पोहोचेल. १ तास हेअर मास्क असेच राहू द्या, नंतर केस शैम्पूने धुवा.

नीळ (इंडिगो) आणि हिना मेंहदी

नीळ (इंडिगो) हा नैसर्गिक रंग मानला जातो आणि केसांच्या रंगातही वापरला जातो. या नीळमध्ये हिना मेंहदी मिक्स करून पांढऱ्या केसांना लावा, यामुळे पांढरे केस देखील काळे होतील.

खोबरेल तेल

खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळा, पांढरे केस काळे करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. हे दोन्ही एकत्र केल्याने एक रासायनिक प्रतिक्रिया होते ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होतात.

काळा चहा

पांढरे केस काळे करण्यासाठी ब्लॅक टी हा एक उत्तम उपाय आहे. शॅम्पू लावल्यानंतर केसांना लावा. याशिवाय काळ्या चहाची काही पाने गरम पाण्यात २ तास भिजवून ठेवा आणि त्याची पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट लिंबूमध्ये मिसळा आणि केसांना ४० मिनिटे ठेवा. यामुळे तुमचे केस काळे होतील.

(टीपएल वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: White hair 5 effective remedies amla powder curry leaves indigo henna coconut oil lemon black tea scsm