WHO च्या सल्ल्यानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी सांगितले की, सौम्य किंवा मध्यम आजार असलेल्या लोकांना बरे झालेल्या करोना विषाणूच्या रुग्णांच्या रक्तापासून घेतलेल्या प्लाझ्माचा वापर करून कोविड उपचार देऊ नये. आम्ही तुम्हाला सांगतो की, सुरुवातीच्या काळात रक्ताच्या प्लाझ्माद्वारे उपचाराचे चांगले परिणाम मिळण्याचा दावा केला जात होता. परंतु, आता ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या सल्ल्यानुसार, WHO ने सांगितले आहे की “सध्याचे पुरावे असे सूचित करतात की ते जगण्याची क्षमता वाढवत नाही किंवा वैद्यकीय वेंटिलेशनची गरज कमी करत नाही.” तसेच, ते खर्चिक आणि वेळखाऊ आहे.”

WHO ने आणखी काय म्हटले?

डब्ल्यूएचओने करोनाची गंभीर लक्षणे नसलेल्या लोकांना रक्त प्लाझ्मा उपचार देण्याविरुद्ध “कठोर शिफारस” केली आहे. यासोबतच गंभीर आजार असलेल्या रूग्णांच्या क्लिनिकल ट्रायलचा भाग म्हणून उपचार देण्यासही सांगण्यात आले आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा हा निरोगी कोविड रुग्णाच्या रक्ताचा द्रव भाग असतो, ज्यात संसर्गातून बरे झाल्यावर शरीराद्वारे तयार केलेले अँटीबॉडीज असतात. WHO ने सांगितले आहे की नवीनतम शिफारसी १६ चाचण्यांच्या पुराव्यावर आधारित आहेत, ज्यात १६,२३६ गैर-गंभीर, गंभीर आणि अत्यंत गंभीर कोरोना रुग्णांचा समावेश आहे.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Why Arvind Kejriwal allowed to keep toffees with him in Tihar jail
डायबिटीस असलेल्या अरविंद केजरीवालांना जेलमध्ये का देणार चॉकलेट-गोळ्या? मधुमेहींना कसा होतो गोडाचा फायदा?
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

भारतात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे?

मुंबईत गेल्या महिन्यात परदेशातून परतलेल्या दोघांना करोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मची लागण झाल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत विषाणूच्या या नवीन स्वरूपाची ही पहिलीच प्रकरणे आहेत. या प्रकारामुळे आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १० झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये असे म्हटले आहे की दक्षिण आफ्रिकेतून परत आलेला एक व्यक्ती अमेरिकेतून परतलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्या संपर्कात होता आणि दोघेही ओमिक्रॉन असल्याचे आढळून आले आहे. विज्ञाप्तिनुसार असे सांगण्यात आले की या दोन्ही व्यक्तींनी अँटी-कोविड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता संपूर्ण देशात ओमिक्रॉनची एकूण २३ प्रकरणे समोर आली आहेत.

परदेशातून आलेले १०० हून अधिक लोकं महाराष्ट्रातून झाले बेपत्ता

गेल्या काही दिवसांत परदेशातून महाराष्ट्रात आलेले सुमारे १०० प्रवासी बेपत्ता झाले आहेत. प्रशासन आता या लोकांची माहिती गोळा करत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, परदेशातून ठाणे जिल्ह्यात आलेल्या २९५ परदेशी प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांबद्दल काहीही माहिती नाही. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, यातील काहींचे मोबाईल बंद आहेत. एवढेच नाही तर परदेशातून आलेल्या प्रवाशांनी आपला पत्ता दिला होता, त्याला आता कुलूप लागले आहे.