१ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची थट्टामस्करी करत त्यांना मूर्ख बनवतात. हा दिवस शतकानुशतके साजरा केला जात आहे, परंतु तो प्रत्यक्षात कधी सुरू झाला हे कोणालाही माहिती नाही. १३८१ मध्ये, पहिल्यांदाएप्रिल फुल दिवस साजरा केला गेला, असं सांगितलं जातं. यामागे दोन मनोरंजक कथा असल्याचं सांगितलं जातं.
पहिली मनोरंजक कथा: एप्रिल फूल डे साजरा करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी ३२ मार्च १३८१ रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. लग्नाच्या बातमीने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते. असं असलं तरी कॅलेंडरमध्ये ३२ मार्च ही तारीख नाही. राजा-राणीने आपल्या लग्नाची खोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. ३२ मार्च हा दिवस नाही म्हणून १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात येतो.
दुसरी मनोरंजक कथा: फ्रान्समध्ये १५८२ मध्ये पोप चार्ल्स यांनी जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू केले, त्यानंतरही काही लोक जुन्या तारखेला नवीन वर्ष साजरे करत होते. जुन्या कॅलेंडरनुसार जे नवीन वर्ष साजरे करणार होते, त्यांना एप्रिल फूल संबोधलं गेले.
आजपासून बँकिंग, टॅक्सबाबत हे नियम बदलले, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार
काही मजेशीर प्रँक्स– तुम्हालाही एप्रिल फूल डेच्या दिवशी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत काही प्रँक्स करायचे असतील तर पुढे दिलेले फोटो बघा.
आपण थट्टामस्करी, विनोद कधीही करू शकतो. पण यातून कुणाचाही भावना दुखवणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण १ एप्रिल या दिवशी केलेल्या मस्करीचा शक्यतो कुणाला राग येत नाही. कारण या दिवसाचं महत्त्वच तसं आहे.