ओझोन दिवस पर्यावरणासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. लोकांना ओझोनच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य ते उपाय शोधण्यासाठी ‘जागतिक ओझोन दिन’ दरवर्षी १६ सप्टेंबरला साजरा होतो. वातावरणातील ओझोनच सुरक्षा कवच राखून ठेवण्यासाठी हा दिवस लक्षवेधी ठरतो. मात्र, माणसाने पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी काय केले नाही तर काय होत याची आठवण करून देणारा हा दिवस होय.

जागतिक ओझोन दिवसाचा इतिहास

१६ सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला. ओझोन थर कमी होत असल्याच्या बाबीला वैज्ञानिक आधार मिळाल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला ओझोन थराच्या संरक्षणासाठी यंत्रणा तयार करणे भाग पडले. व्हिएन्ना परिषदेत ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला. याला २८ देशांनी मान्यता दिली आणि २२ मार्च १९८५ ला यासंबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या. सप्टेंबर १९८७ मध्ये ओझोन लेअर कमी करणार्‍या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार झाला.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

ओझोनचा थर वाचवण्यासाठीच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तब्बल ३० वर्षांनी या आवरणाला छिद्र पडल्याचे समोर आले. वाहने, कारखाने आणि इतर कारणांनी उत्सर्जित होणाऱ्या हानिकारक रासायनिक वायूंमुळे ओझानवर विपरीत परिणाम होत आहे. हा परिणाम आणखी ५० ते १०० वर्षे चालू राहण्याची शक्यता आहे. या कारणाने या विषयाचा पर्यावरणाच्या अभ्यासात विविध अभ्यासक्रमांत समावेश करण्यात आला आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी १५ ऑक्टोबर २०१६ मध्ये रवांडा येथील किगाली येथे २८ व्या बैठकी दरम्यान हायड्रोफ्लुरोकार्बनची पातळी खाली आणण्यासंबंधी करार केला. हा करार किगाली करार म्हणून ओळखला जातो.

 ओझोन थराचे संरक्षण

ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो. परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो. जर सूर्यावरील अल्ट्रा व्हायलेट किरण थेट पृथ्वीवर पडले तर मानवाशिवाय झाडे आणि प्राणी आणि इतर जीव यांच्यावर याचा अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ओझोन थराचे जतन करणे फार महत्वाचे आहे. पृथ्वीवरील आपल्या जीवनासाठी ओझोन महत्त्वपूर्ण आहे आणि आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी ओझोन थराचे संरक्षण करणे चालू ठेवले पाहिजे.

ओझोन थर खालावण्यापासून रोखण्यासाठी या तीन बाबी लक्षात ठेवा.

१) विविध उत्पादनांमधून बाहेर पडलेली विषारी रसायने ओझोन थराला हानी पोहोचवतात. याकरिता पर्यावरणपूरक वस्तु खरेदी करा.

२)  रेफ्रिजरेटर आणि एसी सारख्या दैनंदिन वापराची उपकरणे सीएफसी (क्लोरोफ्लुरोकार्बन) उत्सर्जित करतात. यासाठी सीएफसी उत्सर्जित करणारी उत्पादने टाळा.

३) वाहनांमधून निघणार्‍या धुरामुळे प्रदूषण होते. यामुळे ओझोन आवरणाची हानी होते. याकरिता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.