सकाळी ताजेतवाने व उत्साही वाटलं पाहिजे; पण तुम्ही कधी उठल्या उठल्या पोटात गडबड आणि शरीरात एक विचित्र अस्वस्थता घेऊन उठला आहात का? आजच्या वेगवान जीवनशैलीत आपल्यापैकी बरेच जण या अस्वस्थतेचा सामना करतात; परंतु त्याबद्दल क्वचितच बोलतात त्यापैकी ही एक आहे. रात्री उशिरा जेवणे, अनियमित खाण्याच्या सवयी, ताणतणाव किंवा पुरेशी हालचाल न करणे यांमुळे हे अनेकदा होते. चला तर यावरील एक घरगुती उपाय पाहू…

लवंग हा एक असा गरम मसाला आहे, जो केवळ जेवणाची चव वाढवायलाच मदत करत नाही, तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. लवंग हे अतिशय प्राचीन काळापासून नैसर्गिक औषध म्हणून वापरले जात आहे. व्हिटॅमिन सी, ई, के, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारख्या अनेक पोषक घटकांनी समृद्ध असलेली लवंग आरोग्यासाठी अनेकविध दृष्ट्या फायदेशीर आहे. लोक जवळजवळ दररोज जेवणात लवंगांचा वापर करतात. परंतु, त्याचे सेवन करण्याचा एक मार्ग आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण, लवंगांचे पाणी सेवन करण्याचे स्वतःचे फायदे आहेत. रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंगांचे पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. कोमट पाण्यात भिजवलेल्या फक्त दोन लवंगांमुळे पचनक्रिया निरोगी पाहू शकते.

लवंगांचे पाणी : गंभीर फायद्यांसह एक साधा घोट लवंग

लवंग हा भारतीय स्वयंपाकघर आणि पारंपरिक औषधांमधला प्रमुख पदार्थ आहे. तीव्र सुगंध आणि उबदार, किंचित गोड चवीसाठी ओळखला जाणारा हा छोटासा मसाला शक्तिशाली संयुगांनी भरलेला आहे. लवंगाच्या सेवनानं पचनशक्ती वाढते. तसेच पोटातील जठरासंबंधीच्या समस्या कमी होतात आणि आतड्यांचे एकूण आरोग्य सुधारते. जर्नल ऑफ फार्माकोग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लवंग अतिसार आणि पोटाच्या अस्वस्थतेची लक्षणे दूर करण्यासाठीही प्रभावी आहे.

लवंगेतील पचनशक्तीच्या गुणधर्मामागील लवंगेमुळे मिळणारी पचनशक्ती – लवंगेमुळे मिळणारी पचनशक्ती युजेनॉलमुळे आहे, जे एक नैसर्गिक संयुग आहे. हे संयुग त्याच्या दाहकविरोधी, कार्मिनेटिव्ह (वायुनिवारक) आणि प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. युजेनॉल पचनमार्गाच्या गुळगुळीत स्नायूंना आराम देण्यास मदत करते, गॅस व पोटफुगी कमी करते आणि पाचक एंझाइम सोडण्यास प्रोत्साहन देते.

सकाळी लवंगांचे पाणी का प्यावे? रिकाम्या पोटी लवंगांचे पाणी सेवन केल्यास विषाक्त घटक बाहेर काढण्यास मदत मिळते, पचनक्रिया उत्तेजित होते. पोषणतज्ज्ञ मिताली शाह स्पष्ट करतात, “रात्रीच्या वेळी आपली पचनशक्ती मंदावते सकाळी लवंगांचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते आणि पोटातील सूज किंवा घट्टपणाची भावना कमी होण्यास मदत होते.”

लवंगांचे पाणी कसे बनवायचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवंगांचे पाणी पिण्याचे अनेक फायदे जाणून घेतल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न येत असेल की, ते कसे बनवायचे. चला तर जाणून घेऊ हे पाणी बनवण्याची योग्य पद्धत. सर्वप्रथम पाच ते सहा लवंगा एक ग्लासभर कोमट पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. आता सकाळी हे पाणी मंद आचेवर उकळायला ठेवा. हे पाणी सुमारे १५ मिनिटे उकळू द्या. त्यामुळे लवंगांचा अर्क पाण्यात चांगले मिसळेल. आता ते पाणी थोडे थंड होऊ द्या आणि मग ते घोट घोट या प्रमाणात प्या.