Are You Like A Magnet For Mosquitoes : पावसाळा आला की डासांची पैदास खूप वाढते त्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढते. पण इतरांपेक्षा तुम्हालाच जास्तच डास चावतात असे तुम्हाला वाटते का? जर तुमच उत्तर होय असेल तर असे वाटण्यात काही गैर नाही. तुम्हाला जे वाटत आहे त्यामागे त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. नुकत्याचा झालेल्या एका संशोधनातून असा खुलासा झाला आहे की, डासांच्या विविध प्रजाती विविध लोकांकडे आकर्षित होतात.
संशोधन काय सांगते?
फ्लोरिडा इंटरनॅशनल यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ११९ लोकांना हे संशोधन केले आहे. यामध्ये जगातील तीन अशा डासांच्या प्रजातींचा समावेश करण्यात आला होता ज्या माणसांना कित्येक आजार पसरवू शकतात. संशोधनकर्त्यांनी या तीन डासांच्या प्रजातींना मानवी गंध आणि शरीरातून बाहेर पडणारे रासायनिक संकेत कसे आकर्षित करते याचा अभ्यास केला.
कोणत्या डासांच्या चावण्यामुळे कोणते आजार होतात?
संशोधनातील माहितीनुसार.एजिप्टी(aegypti) , एडीज एल्बोपिक्टस (Aedes albopictus) आणि क्यूलेक्स क्विनक्वेफॅसिएटस (Culex quinquefasciatus) यांता समावेश केलाह होता. या तीन डासांच्या प्रजाती विविध आजार पसरवण्याची भूमिका पार पाडतात. यामध्ये डेंग्यू, झिंका, येलो फिव्हर, आणि वेस्ट नाईल सारख्या आजारांचा समावेश आहे. निर्ष्कष थक्क करणारे होते. तिव्ही प्रजातींनी एकाच प्रकारच्या लोकांना चावण्यास पंसती दर्शवली. प्रत्येक प्रजानी मानवी शराराची गंध आपल्या पद्धतीने ओळखला आणि त्या आधारावर कोणत्या व्यक्तीला चावायचे याची निवड केली.
खरंतर मानवी शरीरातून एक हजारपेक्षा जास्त प्रकारच्या बाष्पशील सेंद्रिय संयुगे (Volatile organic compounds) बाहेर पडतात. यापैकी कित्येकांबाबत वैज्ञानिकांचा अजून पूर्ण माहिती मिळालेली नाही. ही रसायणे आपल्या नैसर्गिक गंधाचा भाग असतात. डासांसाठी हे एखाद्या संकेताप्रमाणे कार्य करते.
कोणत्या गोष्टीमुळे मच्छर होतात आकर्षित
संशोधनातून समोर आले की, पहिली डासांची प्रजाती म्हणजेच एजिप्टी(aegypti) अशा लोकांकडे जास्त आकर्षित झाले ज्यांच्या त्वचेतून काही खास बाष्पशील सेंद्रिय संयुगे कमी प्रमाणात होते आणि जे कोणताही अतिरिक्त गंध (परफ्यूम, बॉडी स्प्रे किंवा अत्तर) वापरत नव्हते. अशा प्रजातींनी पुरुषांकडे जास्त आकर्षित होत असल्याचे समोर आले. हे मच्छर दिवसा जास्त सक्रिय असतात.
दुसरी डासांची प्रजाती म्हणजेच एडीज एल्बोपिक्टस (Aedes albopictus) ज्याला टायगर मच्छरदेखील म्हटले जाते हे मच्छर त्वचेच्या नैसर्गिकरित्या बाहेर पडणाऱ्या काही खास केटोन्स आणि वनस्पतींसारखा गंध येणाऱ्या रसायनांकडे जास्त आकर्षित झाले. ही दिवसभर सक्रिय राहणारी प्रजाती आहे.
तिसरी डासांचीची प्रजाती म्हणजेच क्यूलेक्स क्विनक्वेफॅसिएटस (Culex quinquefasciatus) निवड सर्वात वेगळी होती. हे मच्छर सामान्यत: रात्रीच्या वेळी सक्रिय असतात आणि मानवी त्वचेवरील मायक्रोबायोम म्हणजेच बॅक्टेरिया, फंगस आणि इतर सुक्ष्मजीवांच्या समुदाय ओळखण्यावर जास्त अवलंबून होते.
आपल्या त्वचेवर लाखों करोंडो सुक्ष्मजीव असतात. हे मायक्रोब्स आपल्या त्वचेच्या गंधावर परिणाम करतात. संशोधनातून समोर आले की, काही बॅक्टेरियर समुहा डासांंना मानवाकडे आकर्षित करतात तर काही दुसरे बॅक्टेरिया मानवी त्वचेपासून दूर जाण्यास भाग पाडतात.
हे संशोधन वैज्ञानिक जर्नस आयसयन्समध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनकांच्या टीमचे नेतृत्व एफआययूच्या न्युरोजेनिटिसिस्ट मॅथ्यू डिगेनारो यांनी केले. तर याचे संशोधन पीएचडी विद्यार्थी कायली मारेरो यांनी केले. संशोधकांच्या मते, हे निष्कर्ष भविष्यात डासांमुळे पसरणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी नवीन पद्धती विकसित करण्यात मदत करू शकतात.
