Keep This ‘White’ Kitchen Ingredient Under Your Pillow at Night: रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा एक पांढरा पदार्थ केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर त्याचा संबंध चांगली झोप, श्वासाचे आरोग्य आणि काही पारंपरिक समजुतींनुसार सकारात्मक ऊर्जेशीही जोडला जातो. अनेक वर्षांपासून घरगुती उपाय आणि आयुर्वेदामध्ये रात्री झोपताना हा पदार्थ उशीखाली ठेवण्याची पद्धत सांगितली जाते. तुमच्याही मनात कुतूहलाची कळी उमलली असेल ना की, हा पदार्थ आणि झोप यांचा परस्पर काय संबंध? चला तर मग, या अनोख्या उपायामागचं कारण आणि त्याचे सांगितले जाणारे फायदे जाणून घेऊया…

१. साखरझोप मिळण्यास चालना

आजकाल वेळेवर झोप न लागणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. मानसिक ताण इतका वाढला आहे की, लोक अंथरुणावर झोपताना बाजू बदलत राहतात. या पदार्थातील सल्फरयुक्त संयुगे आणि त्याचा विशिष्ट वास मेंदूवर सौम्य परिणाम करू शकतो, असं काही लोकांचं मत आहे. त्यामध्ये बी६ हे जीवनसत्त्व असतं, जे निद्रानाश या झोप न येण्यासंबंधीच्या आजारामध्ये अत्यंत उपयुक्त ठरतं.

२. दमा आणि श्वासाच्या त्रासात आराम

त्यामध्ये ‘ॲलिसिन’ नावाचं एक संयुग असतं, जे जंतू आणि विषाणूंशी लढण्यास मदत करतं. काही लोकांच्या मते, त्याच्या वासामुळे नाक मोकळं झाल्याचा अनुभव मिळू शकतो आणि श्वास घेणं काही प्रमाणात सोपं होऊ शकतं.

३. नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यास मदत

काही लोकांच्या मते, हा पदार्थ नकारात्मक ऊर्जा आणि वाईट स्वप्नांपासून संरक्षण देतो. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांचा अशा गोष्टींवर विश्वास असतो आणि त्याच विचारधारणेतून अनेक लोक उशीखाली हा पदार्थ ठेवतात.

४. डास आणि कीटकांचं पलायन

रात्री डास, माश्या किंवा इतर कीटकांचा त्रास होत असेल, तर काही लोक उशाजवळ हा पदार्थ ठेवण्याचा सल्ला देतात. जुन्या काळापासून हा उपाय वापरला जात असल्याचं सांगितलं जातं. त्याच्या तीव्र वासामुळे काही कीटक दूर राहू शकतात, असं अनेकांचं मत आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा पांढरा पदार्थ नेमका कोणता? तर, त्याचं उत्तर आहे लसूण. लसूण कार्बोहायड्रेट, तांबे, फॉस्फरस, आहारातील तंतुमय पदार्थ, प्रथिने, पोटॅशियम, लोह, क व बी६ ही जीवनसत्त्वे, मँगनीज, कॅल्शियम व सेलेनियम यांसारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. आयुर्वेद आणि काही पारंपरिक घरगुती उपायांमध्ये रात्री उशीखाली लसणाची एक पाकळी ठेवण्यास सांगितले गेले आहे; मात्रत्यामागील सर्व दाव्यांना ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून, ‘लोकसत्ता’ त्याची पुष्टी करीत नाही. त्यामुळे अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)