बाळाला जन्म देणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद आनंद असतो. गरोदरपणामध्ये महिलांना अनेक गोष्टींचा अनुभव मिळत असतो. या नऊ महिन्यांच्या काळामध्ये त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतरही त्यांची शरीररचना बदलत असते. प्रसूतीच्या वेळी काही कारणांमुळे नॉर्मल डिलीव्हरी करणं शक्य होत नाही. तेव्हा डॉक्टर्स कुटुंबीयाच्या सहमतीने सिझेरियन डिलीव्हरी हा मार्ग अवलंबतात. प्रसूतीच्या वेळी अडचणी आल्याने सी-सेक्शनद्वारे बाळाचा जन्म होत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण सी-सेक्शनमुळे बऱ्याचशा महिलांना वेदना होत असतात. पाठीच्या खालच्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात दुखत असल्याच्या तक्रारी त्या करत असतात. सिझेरियन डिलीव्हरी झाल्यानंतर डॉक्टर्स त्यांना वजनदार गोष्टी उचलू नका असा सल्ला देत असतात. मणक्याच्या जवळ ताण आल्याने शरीराचा खालच्या भागामध्ये तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. ओनली माय हेल्थच्या अहवालानुसार, सी-सेक्शन डिलीव्हरी झाल्यावर पुढे काही महिन्यांमध्ये वेदना कमी-कमी होऊ शकतात. पण या काळात शरीरावर दबाव येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. महिलांना हा त्रास का होतो याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

Cesarean delivery झाल्यानंतर महिलांच्या मणक्याच्या आसपासचा भाग का दुखायला लागतो?

वाढलेल्या वजनामुळे

गरोदरपणात बहुतांश महिलांचे वजन वाढते. प्रसूतीनंतर वजन कमी झाल्यावर पाठ आणि मणका यांवर ताण पडतो. त्यामुळे पाठ दुखते.

हार्मोन्सच्या बदलामुळे

जेव्हा गर्भामध्ये असलेल्या जीवाचा विकास होत असतो, तेव्हा महिलेच्या शरीरामध्ये असंख्य हार्मोनल बदल होत असतात. प्रसूतीपर्यंत अनेक महिलांचे हार्मोन जास्त प्रभावित होतात. सी-सेक्शन डिलीव्हरीनंतर हार्मोन्स सामान्य स्थितीत येतात. या बदलांमुळे मणक्यात वेदना येत असतात.

आणखी वाचा – धक्कादायक.. प्रत्येक पाचव्या गर्भवतीला मधुमेह! कारण काय?

Anesthesia इंजेक्शनमुळे

सिझेरियन डिलीव्हरीच्या वेळी Anesthesia चा वापर केला जातो. याचा प्रभाव अधिक काळासाठी टिकून राहतो. डिलीव्हरीदरम्यान वेदनांचा अनुभव होऊ नये यासाठी हे इंजेक्शन महिलांच्या मणक्यामध्ये दिले जाते. त्यानंतर बराच काळ पाठ, मणका व त्याच्या आसपासच्या भागात वेदना होत असतात.

मानेच्या दुखण्यामुळे

बाळाच्या जन्मानंतर त्याला लगेच आईचे दूध पाजले जाते. सुरुवातीला बाळाला दूध पाजताना काही महिला चुकीच्या Posture मध्ये बसतात आणि त्यामुळे त्यांची माना दुखायला लागते. पुढे यामुळे त्यांची पाठ देखील दुखायला सुरुवात होते.

आणखी वाचा – हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी वेळीच करा कॅल्शियम स्कोअर टेस्ट, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

Hyperthyroidism मुळे

प्रसूतीदरम्यान बऱ्याच महिलांना थायरॉईडचा त्रास होत असतो. त्यामुळे डिलीव्हरी झाल्यानंतर सांधे दुखायला लागतात. परिणामी पेल्विक आणि गुडघ्याच्या हाडांमध्ये वेदना होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do women experience severe back pain after cesarean delivery know reasons behind it yps
First published on: 09-06-2023 at 17:24 IST