Women’s Fear of Having physical relationship : महिलांचे आरोग्य केवळ शारिरीक आजारापर्यंत मर्यादित नाही. यात त्यांच्यात होणारे हार्मोनल, मानसिक आणि विवाहित जीवनातील आरोग्याचा समावेश देखील होतो. अनेकदा जोडपी परस्पर सुसंवाद आणि शारीरिक संबंधांबद्दल बोलतात, परंतु बऱ्याच वेळा काही स्त्रिया शारीरिक संबंध ठेवण्यास तयार नसतात. लोक याला सामान्य गोष्ट समजून सहसा दुर्लक्ष करतता पण यामागे काही गंभीर शारीरिक आणि मानसिक कारणे असू शकतात.

गायनेकोलॉजिस्ट डॉ. अर्चना निरूला यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारिरिक संबध ठेवण्याची इच्छा कमी होण्यामागे फक्त भावनिक कारण नाही तर कित्येक शारिरीक आणि मानसिक आरोग्यासंबधीत समस्या जबाबदार असू शकतात. तज्ज्ञांच्या मते तणाव आणि चिंता महिलांच्या लैंगिक संबधाबाबच्या इच्छांवर सर्वात जास्त प्रभाव होतो. जेव्हा मन सातत्याने तणाव राहते तेव्हा शरीर आणि मेंदू दोन्ही शारिरीक संबधाबाबत कमी रुची दर्शवतात.

तज्ज्ञांच्या मते, हार्मोनल बदल, झोप पुर्ण न होणे, काही औषधांचा वाईट परिणाम, नात्यांमधील तणाव आणि कित्येक आरोग्यासंबधीत समस्यांचा महिलांच्या लैंगिक संबध ठेवण्याची इच्छेवर परिणाम होतो.

अशास्थितीमध्ये या समस्येकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यामागील कारण जाणून घेणे आवश्यक असते. अशा काही कारणांबाबत समजून घेऊ ज्यामुळे महिलांची लैंगिक संबध ठेवण्याच्या इच्छेवर परिणाम होतो आणि अशा स्थितीतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर काय उपाय सांगतात हे देखील जाणून घेऊ.

महिलांमध्ये शारिरीक संबध ठेवण्याची इच्छा कमी होण्याची कारणे (Reasons for decreased desire for physical relationship in women)

हार्मोनल असंतूलन बिघडणे ( Hormonal Imbalance reduces desire for sex)

महिलांमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन सारखे हार्मोन्स लैंगिक इच्छा निर्माण करतो. वाढते वय, मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान किंवा मेनोपॉजच्या काळात हार्मोनल बदल होतात जे लैंगिक संबध ठेवण्याची इच्छा कमी करते. हार्मोनल संतुलन बिघडल्यास मूड, उर्जा आणि अंतर्गत संबधांच्या रुचीवरही परिणाम होतो.

ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर (Overactive bladder reduces desire for physical relationship)

काही महिलांमध्ये ओव्हर अॅक्टिव्ह ब्लॅडरच्या समस्या निर्माण होतात ज्यामुळे वारंवार लघवी आल्याचा भास होतो. कित्येकदा संभोगादरम्यान लघवीची गळती होण्याची भिती देखील वाटते. ही भिती आणि अस्वस्थतेमुळे महिला शारिरीक संबध ठेवणे टाळतात.

तणाव आणि मानसिक तणाव ( stress and mental tension reduces desire for physical relationship)

घर, ऑफिस आणि मुलांची जबाबदारी आणि रोजची धावपाळ यामुळे महिलांचे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सातत्याने तणाव आणि चिंता जाणवत असल्यास मनाला विश्रांती मिळत नाही ज्यामुळे लैंगिक संबध ठेवण्याची महिलांची इच्छा कमी होते. मानसिक शांती आणि स्वतःसाठी स्वतःसाठी वेळ काढणे या स्थितीमधून बाहेर पडण्यास फायदेशीर ठरू शकते.

झोप पुर्ण न होणे( Lack of sleep reduces desire for physical relationship)

पुरेशी झोप न मिळाल्यास शरीर आणि मन दोन्ही थकते. सातत्याने झोप पूर्ण न झाल्यास हार्मोनल संबधावर परिणाम होतो ज्यामुळे लैंगिक संबध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते. चांगली झोप ही उर्जा आणि शारिरीक आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते.

महिला कशा प्रकारे सुधारू शकतात आपले आरोग्य ( how women can improve their health)

नियमित योगा आणि व्यायाम (Regular yoga and exercise)

तज्ज्ञांच्या मते, महिलांनी नियमित योगा, चालणे, स्ट्रेचिंग, प्राणायम आणि इतर व्यायाम केले पाहिजे. या शारिरीक हालचालींमुळे शरिरात एंडोर्फिन सारखे फिल गुड हार्मोन वाढतात. यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो आणि लैंगिक संबध ठेवण्याची इच्छा निर्माण होण्यास मदत मिळू शकते,

अनुलोम-विलोम आणि प्राणायामामुळे मिळेल मानसिक शांती (Anulom-vilom and pranayama will bring mental peace)

मानसिक तणाव महिलांची लैंगिक संबध ठेवण्याची इच्छा कमी करण्याचे मोठे कारण मानले जाते. अशा स्थितीमध्ये अनुलोम-विलोम, खोल श्वास घेत प्रमाणायाम आणि ध्यान केल्यास मनाला शांती मिळण्यास मदत होते.याचा नियमित सराव केल्यास तणाव कमी होतो, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि लैंगिक संबध ठेवण्याच्या इच्छेवर सकारत्मक परिणाम होतो.

स्वयंपाकघरातील मसाले ठरू शकतात फायदेशीर (Kitchen spices can be beneficial)

काही पारंपरिक मसाले जसे लवंग, हळद, केसर, मेथी आणि लहसुन दिर्घ काळापासून आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने वापरले जातात. तज्ज्ञांच्या मतानुसार, संतुलित आहारातील भाग म्हणून या मसल्यांचे सेवन केल्यास शरीरात उर्जा, रक्ताभिसरण आणि एकूण आरोग्य सुधारण्या मदत मिळते ज्यामुळे लैंगिक संबध ठेवण्याची इच्छा सुधारू शकते.

ओमेगा ३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करा (Consume foods rich in omega 3 fatty acids)

ओमेगा ३ फॅटी अॅसिड मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पोषकतत्व मानले जाते. कित्येक संशोधनातून समोर आले आहे की हे मूड आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. यासाठी फॅटी फिश, अळशीच्या बिया, अक्रोड आणि चिया सीड्स सारखे खाद्यपदार्थ आहारात समाविष्ट होऊ शकतात.

व्हिटॅमिनने समृद्ध आहार आवश्यक(Vitamin-rich diet is essential)

शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील थकवा आणि उर्जा कमी होण्याचे कारण ठरू शकते. व्हिटॅमिन ए, बी,सी आणि सी भरपूर फळ, भाज्या, सुका मेवा आणि संपूर्ण धान्य शरीरातील आवश्यक पोषण देतात. संतुलित आणि पौष्टिक आहार हार्मोनल हेल्थ, उर्जेची पातळी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.

नात्यातील संवाद वाढवणे देखील आवश्यक (It is also necessary to increase communication in relationships)

तज्ज्ञांच्या मते, केवळ खाद्यपदार्थ किंवा व्यायाम नव्हे तर जोडीदाराबरोबर मोकळेपणाने संवाद साधणे देखील आवश्यक असते. जर तणाव, थकवा किंवा नात्यात कोणतीही समस्या असेल तर चर्चा केली पाहिजे. भावनित नाते दृढ करण्यासाठी आणि ऐकमेकांमधील सामंजस्य सुधारल्यास महिलांची शारिरीक संबध ठेवण्याची इच्छेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.