scorecardresearch

या सेलिब्रिटींना जीममध्ये आला होता हृदयविकाराचा झटका, तुम्ही व्हा सावध, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

जीममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना पुढे येतात. जीमला जाणाऱ्यांना हृदयविकार का होतो याबाबत जाणून घेऊया.

या सेलिब्रिटींना जीममध्ये आला होता हृदयविकाराचा झटका, तुम्ही व्हा सावध, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
राजू श्रीवास्तव

सुदृढ आरोग्य आणि मजबूत शरीरयष्टीसाठी लोक जीममध्ये जातात. मात्र आता जीममध्ये व्यायाम करताना लोकांची प्रकृती खालवल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली असो किंवा दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव या दोघांनाही जीमध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. यावरून आता जीममध्ये जाऊन किती व्यायाम करावे आणि किती नाही, प्रकृती बिघडेल तर नाही ना असे प्रश्न नक्कीच लोकांना पडत असेल. विशेष म्हणजे, जीममध्ये व्यायाम करणाऱ्यांना हदयविकाराचा झटका का येतो हा मोठा प्रश्न आहे.

अशा लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

डॉक्टरांच्या मते ४० पेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हृदयाचा विकार होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा व्यक्ती मधुमेह आणि रक्तदाब संबंधी आजारांनी ग्रस्त असेल तेव्हाही हृदयाचा विकार होण्याची शक्यता अधिक असते. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार असेल त्यांना धावणे घातक ठरू शकते. अशा लोकांना धावताना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. डॉक्टरांच्या मते, अति व्यायाम केल्याने हृदयाच्या धमन्यांमध्ये साठलेली चरबी फाटण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

(चेहऱ्याप्रमाणे मानही उजळेल, काळेपणा दूर करण्यासाठी करा ‘हा’ उपाय)

जीम जाणाऱ्यांनी या गोष्टींची काळजी घ्यावी

जर तुमच्या कुटुंबामध्ये हृदयाच्या समस्या आधीच सुरू असतील तर तुम्हालाही त्याचा धोका असू शकतो, कारण ते अनुवांशिक देखील असते. वर्कआऊट आपल्या शारीरिक क्षमतांचा विचार करूनच करावा. हृदयविकार येण्याचे संकेत एक आठवडापूर्वीपासून मिळतात. जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा थकल्यासारखे वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करावे, असा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या