वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात, ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात, पण आपल्या भावना कोणाशीही शेअर करत नाहीत. वडिलांच्या या अथक प्रयत्नांबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा विशेष दिवस १९ जून रोजी साजरा केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलांच्या त्याग, प्रेम, जबाबदारी याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य जरी कमी असले तरी तरीही वडिलांप्रती असलेले प्रेम, आदर आणि भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डेची मदत घेता येते. आज आपण जाणून घेऊया, हा दिवस कधी आणि का साजरा करायला सुरुवात झाली.

खरं तर, सोनोराला आई नव्हती आणि तिच्या वडिलांनीच इतर पाच भावंडांसह सोनोराला दोन्ही पालकांचे प्रेम दिले आणि वाढवले. आपल्या वडिलांचे प्रेम, त्याग आणि समर्पण पाहून सोनोराच्या मनात विचार आला की, आईच्या मातृत्वाला समर्पित म्हणून मातृदिन साजरा केला जाऊ शकतो, तर वडिलांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सन्मान म्हणून ‘फादर्स डे’ही साजरा करता येईल.

Father’s Day 2022: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या बाबांना भेट म्हणून द्या ‘हे’ खास गॅजेट्स

वर्षातून किमान एक दिवस वडिलांच्या नावावर असावा. सोनोराच्या वडिलांचा वाढदिवस जूनमध्ये होता, त्यामुळे त्यांनी जूनमध्ये फादर्स डे साजरा करण्यासाठी याचिका दाखल केली. हा दिवस साजरा करण्यासाठी आपली याचिका यशस्वी करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत शिबिरे उभारली. अखेर त्यांची मागणी पूर्ण झाली आणि १९ जून १९१० रोजी प्रथमच फादर्स डे साजरा करण्यात आला.

माहितीनुसार, १९१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्यानंतर १९२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित केला, त्यानंतर १९६६ मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली. १९७२ मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी हा दिवस सुट्टी म्हणून घोषित केला होता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is father day celebrated learn the significance and history of this day pvp
First published on: 17-06-2022 at 13:20 IST