आर्थिक वर्ष २०२१-२२ या ३१ मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यानंतर १ एप्रिल २०२२ पासून २०२२-२३ या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षाचे शेवटचे दोन दिवस उरले असून ३१ मार्च २०२२ पर्यंत महत्वाची कामं उरकण्यासाठी करदात्यांची धावपळ उडाली आहे. अनेक आयकर आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित कार्ये आहेत जी तुम्ही ३१ मार्च २०२२ पूर्वी पूर्ण करावीत. पुढील आर्थिक वर्षात कर वाचवायचा असेल तर त्यासाठी आत्तापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टी वेळेत केल्या नाहीत, तर तुम्ही कर लाभ किंवा इतर कोणताही मोठा फायदा घेण्यापासून वंचित राहू शकता.

  • पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख: पॅनशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. यापूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ होती. तर तुम्ही आता हे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करावे. जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर याचा तुम्हाला दंड भरावा लागेल असे नाही तर तुमचे पॅन कार्ड देखील पूर्णपणे निष्क्रिय होऊ शकते.
  • विलंबित रिटर्न भरण्याची शेवटची तारीख: आर्थिक वर्ष २०२०- २१ किंवा मूल्यांकन वर्ष २०२१- २२ साठी विलंबित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. या तारखेपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल केली गेली नसेल तर तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो, तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
  • आर्थिक वर्ष २०२१- २२ साठी कर वाचवण्याची अंतिम तारीख: तुम्ही अद्याप कर नियोजन पूर्ण केले नसेल किंवा १.५ लाख रुपयांची कलम ८०C मर्यादा पूर्ण केली नसेल किंवा अजून कोणताही कर लाभ घेतला नसेल, तर तुम्हाला घाई करणे आवश्यक आहे कारण याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. हे विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांनी जुन्या कर प्रणालीची निवड केली आणि नवीन कर प्रणालीसह जाण्यास सहमत नाही. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्हाला आयकर कायद्याच्या अध्याय VI A अंतर्गत प्राप्तिकर लाभ मिळू शकतात. PPF, लाइफ इन्शुरन्स, ELSS ते NSC, टॅक्स सेव्हिंग बँक डिपॉझिट इत्यादींमधून निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत. जरी तुम्ही कलम ८०C मर्यादा आधीच संपवली असेल, तरीही तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी धारण करून कर वाचवू शकता. तुम्ही पालकांसाठी भरलेला प्रीमियम देखील कपातीसाठी पात्र आहे. सध्या ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी ही २५,००० रुपये आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ती ५०, ००० रुपये आहे. यापैकी कोणत्याही योजनेसाठी भरलेला प्रीमियम कलम ८० डी अंतर्गत एकूण उत्पन्नातून वजा केला जातो.
  • वित्तीय संस्थांसह सर्व सक्रिय खात्यांचं केवायसी: आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खाते सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक बँक खात्याचे आणि वित्तीय संस्थांमधील सर्व संबंधित खात्यांचे किंवा डिमॅट खाते, शेअर ट्रेडिंग कंपनी इत्यादीसारख्या सेवांचे पुन्हा केवायसी दर दोन वर्षांनी केले पाहिजे. या वर्षी केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • आगाऊ कर भरणे: आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आगाऊ कर भरण्याची अंतिम तारिख १५ मार्च २०२२ होती. आयकर नियमांनुसार, पगारदार व्यक्तीच्या बाबतीत नियोक्त्याने त्यांच्या पगारातून आयकर स्लॅबनुसार कर कपात करणे अनिवार्य आहे, याला टीडीएस म्हणतात. जर करनिर्धारक स्वयंरोजगार व्यावसायिक असेल किंवा त्याला इतर स्त्रोतांकडून उत्पन्न मिळाले असेल, तर त्याने सर्व वजावट विचारात घेऊन सर्व स्रोतांमधून कमावलेल्या उत्पन्नावर देय कराची गणना करणे आवश्यक आहे. जर कर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर आगाऊ कर भरावा लागेल.

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
byju s starts paying salary of march
‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे