आजच्या जीवनशैलीचा आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम केवळ आरोग्यावरच दिसून येत नाही, तर त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. आहारात आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे त्वचेचे आरोग्यही बिघडू लागते. चांगल्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात आवश्यक पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.

त्वचेच्या काळजीसाठी व्हिटॅमिन सीचे सेवन खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी हा एक उत्कृष्ट अँटी-एजिंग घटक आहे जो त्वचा गुळगुळीत करतो. काही संशोधनात हे सिद्ध झाले आहे की चेहऱ्यावर व्हिटॅमिन सीचा वापर करून त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर सहज मात करता येते. चला जाणून घेऊया व्हिटॅमिन सीमुळे त्वचेच्या कोणत्या समस्या दूर होतात.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

(हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरू शकतात? जाणून घ्या)

त्वचेसाठी व्हिटॅमिन सीचे फायदे

व्हिटॅमिन सी हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे चांगले आरोग्य आणि चांगल्या त्वचेसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच त्वचा निरोगी राहते. व्हिटॅमिन सी सर्व प्रकारच्या त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्वचेला चमक आणते. व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने डोळ्यांतील काळी वर्तुळे दूर होतात. ते त्वचेचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करते. व्हिटॅमिन सी जखमा लवकर भरून काढण्यासाठी खूप प्रभावी आहे.

(हे ही वाचा: World Kidney Day 2022: ‘या’ १० सवयी तुमची किडनी करतील खराब)

मुरुमांपासून बचाव करते

व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने त्वचेवरील मुरुम आणि डाग दूर होण्यास मदत होते. दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध, व्हिटॅमिन सी त्वचेखाली येणारे नैसर्गिक तेल तयार करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी चेहऱ्यावरील काळे डाग दूर करते.

(हे ही वाचा: Skin Care: उन्हाळ्यात त्वचेला संसर्गापासून वाचवतो तुळशीचा पॅक; जाणून घ्या कृती)

व्हिटॅमिन सी कसे मिळवायचे?

शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात संत्रा, हिरवी आणि लाल शिमला मिरची, केळी, ब्रोकोली, पपई, स्ट्रॉबेरी, अननस, किवी आणि आंबा यांचा समावेश करा.