मकर संक्रांत हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक नावांनी आणि अनेक प्रकारे साजरा केला जातो. उत्तर भारतात याला मकर संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल तर गुजरातमध्ये उत्तरायण म्हणतात. त्याला आसाममध्ये माघी बिहू, कर्नाटकात सुग्गी हब्बा तर केरळमध्ये मकरविक्लू आणि काश्मीरमध्ये शिशु संक्रांत म्हणतात. नेपाळ आणि बांगलादेश सारख्या शेजारी देशांमध्येही हा सण साजरा केला जातो. हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी यामागचं शास्त्र रंजक आहे.

मकर म्हणजे कॉन्स्टेलशन ऑफ कॅप्रिकॉर्न. खगोलशास्त्रातील मकर राशी आणि भारतीय ज्योतिषशास्त्रातील मकर राशी यामध्ये फरक आहे. संक्रांत म्हणजे संक्रमण, या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. २२ डिसेंबर म्हणजेच हिवाळ्याच्या सर्वात मोठ्या रात्रीनंतर हे संक्रमण होतं. सूर्याच्या प्रवेशाचा किंवा बाहेर पडण्याचा अर्थ असा नाही की सूर्य फिरत आहे, तो पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, याला परिभ्रमण म्हणतात आणि पृथ्वीला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी एका वर्षाचा वेळ लागतो.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

Haldi Kunku Gift Ideas: यंदा हळदी-कुंकवासाठी सुवासिनींना ‘वाण’ काय देणार? जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया

असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात, हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. कारण उत्तर गोलार्धात १४-१५ जानेवारीपर्यंत सूर्यास्ताची वेळ हळूहळू पुढे सरकते. त्यानंतर २१ मार्च ही तारीख येते, जेव्हा दिवस आणि रात्र अगदी समान असतात, त्याला इक्विनॉक्स म्हणतात. याचा अर्थ सूर्य जवळजवळ उत्तर गोलार्धाच्या मध्यभागी असतो. सूर्यास्ताच्या वेळेत हळूहळू बदल होणे म्हणजे हिवाळा कमी होतो आणि उन्हाळा वाढायला सुरुवात होते. कारण सूर्य उत्तर गोलार्धात जास्त काळ राहणार असतो.

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल

मकरसंक्रांत ही नेहमी १४ जानेवारी रोजीच येते हा गैरसमज असून मकरसंक्रांत व १४ जानेवारी यांचा तसा काहीही संबंध नाही. २०१८ मध्ये मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी आली होती. दर ४०० वर्षांनी निरयन मकरसंक्रांत तीन दिवसांनी पुढे जाते. दरवर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंदाचा कालावधी साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. सन २०० मध्ये मकरसंक्रांत २२ डिसेंबर रोजी, १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. पुढे १९७२ पर्यंत मकरसंक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून १९८५ पर्यंत ती कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारी रोजी होती. २१०० पासून निरयन मकरसंक्रांत १६ जानेवारी रोजी येईल. अशा प्रकारे मकरसंक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात सन ३२४६ मध्ये मकरसंक्रांत १ फेब्रुवारी रोजी येणार आहे.

(वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे.)