Premium

नेलकटरमध्ये का असतात विचित्र आकाराचे दोन चाकू? ते कशासाठी वापरतात? जाणून घ्या

तुम्ही पाहिले असेल की नेलकटरमध्ये नेहमी दोन चाकू सतात. एक साधा चाकू असतो आणि दुसरा वाकड्या तिकड्या आकाराचा विचित्र चाकू असतो. त्याचा आकार असा विचित्र का असतो आणि तो कशासाठी वापरतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

nail cutters
नेलकटरमध्ये दोन चाकू का असतात? (फोटो सौजन्य – फ्लिरकार्ट)

तुम्ही आठवड्यातून एकदा नेल कटरचा वापर केला असाल. ही अशी वस्तू आहे, जी इच्छा नसतानाही वापरावी लागते, कारण नखे वाढल्यानंतर त्यामध्ये घाण साचते आणि मग ती आपल्या पोटात जाऊन आपल्याला आजारापणास कारणीभूत ठरू शकते. जवळपास प्रत्येक नेल कटरची रचना समान असते. पण त्यात एक विचित्र गोष्ट आहे, ज्याच्या वापराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जवळजवळ प्रत्येक नेल कटरकडे दोन चाकू असतात. एक साधा छोटा चाकू पण दुसरा अतिशय विचित्र आकाराचा असतो ज्याने काहीही कापणे जवळजवळ अशक्य आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या वापराबद्दल सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फायलर म्हणूनही वापरतात नेटकटर

नेल कटरचे काम नखे कापण्याचे आहे. मग त्यात दोन चाकूसारखे ब्लेड का दिले आहेत. कारण त्याने नखे कापली जाऊ शकत नाहीत. नेल कटरच्या हँडलवर अनेक दुसऱ्या बाजूला रेषा रेषांनी खरबडीत असलेला भाग असतो हे तुम्ही पाहिले असतील. या रेषा फाइलर म्हणून काम करतात. स्त्रिया त्यांच्या नखांना मऊ करण्यासाठी आणि आकार देण्यासाठी फायलर वापरतात, परंतु नेटकरमध्ये चाकू कशासाठी देतात?

हेही वाचा – कांदा कापल्यानंतर थंड पाण्यामध्ये का भिजवतात माहितीये ? हे आहे कारण …

साधा चाकूचे काय असते काम?

नेल कटरमध्ये दोन ब्लेड जोडले जातात जेणेकरून त्याचा अधिक वापर करता येईल आणि त्याची उपयुक्तताही वाढते. एक लहान चाकू दिला जातो. हा चाकू छोट्या छोट्या गोष्टी कापण्यास किंवा सोलण्यास मदत करु शकतो. जर तुम्हाला एखादे पॅकेट फाडायचे असेल किंवा दोरा कापायचा असेल तर हा चाकू कामी येतो. या चाकूवर नखाचे खुणही आहेत ज्यामुळे तो नेल कटरच्या आत बाहेर काढता येतो. यासोबतच अनेकजण या चाकूने नखाच्या आतील घाणही साफ करतात.

नेलकटरमध्ये दोन चाकू का असतात? (फोटो सौजन्य – फ्लिरकार्ट)

विचित्र आकाराच्या चाकू कशासाठी वापरतात?

विचित्र आकाराच्या चाकूचे काम काय असते ते आता आम्ही तुम्हाला सांगतो. खरं तर, हा चाकू नाही, तो एक प्रकारचा बॉटल ओपनर आहे. तुम्ही कुठेतरी बाहेर असाल आणि तुमच्याकडे फक्त नेल कटर असले तरी, याच्या मदतीने तुम्ही बाटलीचे सीलबंद झाकण किंवा थंड पेयाचे झाकण उघडू शकता. या चाकूचे दोन्ही भाग झाकणामध्ये अडकवले जातात आणि ते थोड्या जोर लावून ओढले की झाकण उघडते.

नेलकटरमध्ये दोन चाकू का असतात? (फोटो सौजन्य – फ्लिरकार्ट)

हेही वाचा – DIY Cleaning Tips: किचन टाईल्सपासून ओव्हनपर्यंत, साफसफाईसाठी वापरा व्हिनेगर! जाणून घ्या कसे वापरावे?

महिलांना स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी होतो उपयोग

नेलकटरमध्ये दोन चाकू का असतात? (फोटो सौजन्य – फ्लिरकार्ट)

महिला त्यांच्या पर्समध्ये नेल कटर देखील ठेवतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. संकटाच्या वेळी, जर त्यांना स्वतःचा बचाव करायचा असेल आणि हल्ला करण्यासारखे काही नसेल, तर नेल कटरचे हे दोन चाकू हल्लेखोरांना खोल जखमा करण्यासाठी पुरेसे धारदार असतात!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 18:00 IST
Next Story
Health special: पोटातील ‘हे’ सूक्ष्मजीव ठरताहेत भविष्यातील प्रभावी जैविक औषध!