अशा अनेक समजुती आहेत, ज्या आपण फार आधीपासून पळत आलो आहोत. पण आपण त्या का पाळतो हे आपल्याला कळत नाही. मात्र कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची शास्त्रीय बाजूही जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण अशाच काही समजुती आणि त्यामागच्या शास्त्रीय कारणांबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला अशा अनेक गोष्टी करायला सांगतात, ज्याच्या मागे कोणतेही तर्क नसते. आश्चर्याची बाब म्हणजे, या गोष्टी करण्यामागील कारण माहीत नसतानाही अनेक लोक या गोष्टींचे अत्यंत काटेकोरपणे पालनही करतात. परंतु, फक्त ऐकलेल्या गोष्टींचे पालन करणे ही अंधश्रद्धा आहे.

तुम्ही अनेकांना घराबाहेर आणि दुकानाबाहेर लिंबू आणि मिरची लटकवताना पाहिले असेल. असे केल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो असे म्हणतात. पण या मागची खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. वास्तविक, लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते आणि मिरची तिखट असते. जेव्हा ते दाराबाहेर टांगले जाते तेव्हा आंबट आणि तिखट सुगंध कीटक आणि कोळी यांना घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. जेव्हा आरोग्य चांगले असेल तेव्हा तुम्ही चांगले कामही कराल आणि यशाचे मार्गही खुले होतील.

घरामध्ये ‘हे’ संकेत दिसणे असते खूपच शुभ; लवकरच होऊ शकते धनप्राप्ती

त्याचप्रमाणे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे कारण न जाणून घेता आपण त्या करत असतो. पण कोणतीही प्रथा उगाच बनवली जात नाही. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण दडलेले असते. आज आपण अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपण करतो, पण त्यामागे लपलेल्या वैज्ञानिक तथ्यांबद्दल आपल्याला माहिती नसते.

  • नदीत नाणी फेकणे :

तुम्ही प्रवासादरम्यान अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा रेल्वे किंवा बस नदीच्या पुलावरून जाते तेव्हा अनेकजण त्यात नाणी टाकतात. पण ते असं का करतात याचे कारण आपल्याला माहीत नसते. खरे तर पूर्वीच्या काळी तांब्याची नाणी वापरली जात होती. तांब्यामध्ये पाणी शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा कोणी नदीवरून जात असे तेव्हा ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात तांब्याचे नाणे टाकत असे. हळूहळू तो एक ट्रेंड बनला, जो आजही प्रचलित आहे. आज तांब्याची नाणी नाहीत, पण तरीही आपले नशीब चमकेल, अशा विश्वासाने लोकं नदीत नाणी टाकतात.

  • मांजर आडवी जाणे :

कुठेही जात असताना जर आपल्याला मांजर आडवी गेली, तर तिथे काही वेळ उभं राहून नंतरच पुन्हा प्रवास सुरु करावा; अन्यथा कामात अडचण येते, असे म्हणतात. त्यामुळे आपल्याकडे मांजर आडवी जाणे अशुभ मानले जाते. मांजर आडवे जाणार हे पाहून अनेकजण मार्ग बदलतात. पण असं का म्हटलं गेलंय, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.

खरे तर पूर्वीच्या काळी लोक व्यवसायानिमित्त बैलगाडी आणि घोडे यांनी दूरवर प्रवास करत असत. रात्रीच्या वेळी मांजर जंगलातून जाताना दिसले तर तिचे डोळे चमकतात, ज्यामुळे बैल आणि घोडे घाबरतात. त्यामुळे रस्त्यावरून मांजर जाताना पाहिल्यानंतर लोक काही काळ प्रवास थांबवायचे आणि मांजर गेल्यावर पुन्हा प्रवास सुरु करायचे. हळुहळु या गोष्टीचा अर्थ बदलला आणि लोकांनी मांजर आडवे जाणे हे अशुभ मानले गेले.

२३ मे पासून ‘या’ पाच राशींच्या लोकांचे चमकणार नशीब; देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहणार

  • प्रसूतीनंतर ४० दिवसांचा नियम :

जेव्हा एखाद्या महिलेची प्रसूती होते तेव्हा तिला ४० दिवस खोली सोडू नका असे सांगितले जाते. पण याचे कारण असे की प्रसूतीनंतर महिलेचे शरीर खूप अशक्त होते आणि तिला विशेष काळजी घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत तिला काम करायला लावले तर ती आणखी अडचणीत येईल. त्याच्या सोईसाठी हे कडक नियम केले गेले. ज्याचे आजही पालन केले जाते.

  • स्मशानभूमीतून परतल्यानंतर स्नान करणे :

स्मशानभूमीतून परतल्यावर सर्वजण आंघोळ करतात. यालाही शास्त्रीय कारण आहे. वास्तविक, मृत शरीरात हानिकारक जीवाणू वाढतात. स्मशानभूमीत अशा अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. अशा स्थितीत तिथे उपस्थित असलेले लोक या जीवाणूंच्या संपर्कात येतात. त्यामुळे स्मशानभूमीतून परतल्यानंतर स्नान करणे आवश्यक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why throw a coin in the river why take a bath after coming out of the cemetery find out the scientific reasons behind this pvp
First published on: 20-05-2022 at 15:31 IST