Soya Biryani Recipe: जर तुम्हाला प्रोटीनयुक्त बिर्याणी खाण्याची आवड असेल तर तुम्ही सोया चंक्स बिर्याणी बनवू शकता. ही खायला खूप चविष्ट आहे. तुम्ही तुमच्यानुसार बिर्याणी देखील कस्टमाइज करू शकता. तसंच वजन कमी करायचं असेल तर पांढऱ्या तांदळाच्या ऐवजी ब्राऊन राइसही घालू शकता. चला तर जाणून घ्या सोया चंक्स बिर्याणी कशी बनवायची…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(हे ही वाचा: Recipe: लसणाचे सेवन पोटासाठी फायदेशीर, जाणून घ्या पराठ्याची रेसिपी)

साहित्य

  • सोयाचे चंक्स
  • बासमती तांदूळ
  • आले-लसूण पेस्ट
  • हळद पावडर
  • मिरची पावडर
  • गरम मसाला
  • बिर्याणी मसाला
  • मेथीचे दाणे
  • दही
  • हिरवी मिरची
  • बटाटा
  • गाजर
  • बीन्स
  • जिरे
  • तमालपत्र
  • लवंगा
  • वेलची
  • काळी मिरी
  • दालचिनी
  • मिंट
  • हिरवी धणे
  • तूप
  • केशर
  • दूध

(हे ही वाचा: रात्री फळं खावीत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य वेळ)

कृती

सोया चंक्स गरम पाण्यात भिजवून काही मिनिटे ठेवा. सोयाचे तुकडे चाळून त्यात आले-लसूण पेस्ट, हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घाला. चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घाला. सर्वकाही एकत्र करा आणि त्यात दही, हिरवी मिरची, बटाटे, गाजर आणि बीन्स घाला. तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या देखील टाकू शकता. शेवटी, ताजे पुदिना आणि कोथिंबीर घाला, सर्वकाही एकत्र करा आणि बाजूला ठेवा. कढईत थोडे तेल आणि तूप टाका आणि त्यात थोडे जिरे, तमालपत्र, लवंगा, वेलची, काळी मिरी आणि दालचिनीच्या काड्या घाला. त्यांना तडतडू द्या. त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून शिजवा. आता मॅरीनेट केलेले सोया चंक्स घालून शिजवा.

(हे ही वाचा: Diabetes : मेथी दाणे साखर नियंत्रित ठेवण्यासाठी करतात मदत, जाणून घ्या फायदे)

आता भिजवलेला बासमती तांदूळ, तळलेले कांदे, ताजा चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घाला. केशर दूध आणि तूप घाला. थोडे अधिक पाणी घालून एक शिट्टी येईपर्यंत शिजवा. आणि थोड्याच वेळात, तुमची झटपट सोया चंक्स बिर्याणी खायला तयार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wight loss soybeans are useful for weight loss learn the soya chunks biryani recipe ttg
First published on: 26-06-2022 at 15:14 IST