कच्चा लसूण खाल्यास त्यात असलेल्या अ‍ॅलिसिनमुळे (allicin)एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी किंचित कमी होऊ शकते आणि त्याचा परिणाम मर्यादित आहे तो औषधांना पर्याय ठरत नाही. कच्चा लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि अँटिऑक्सिडंट्स वाढवतो. दररोज १-२ लसणाच्या पाकळ्या घेण्याची शिफारस केली जाते परंतून सप्लिमेंट घेत असल्यासआणि रक्त पातळ करण्याची अथवा विशिष्ट औषध घेत असल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.

सकाळी उठताच कच्चा लसूण खाल्यास खरंच एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होतो का?(Can Morning Garlic Lower Cholesterol? Benefits, Mechanism & Safe Dosage)


ज्यांची कोलेस्ट्रॉल पातळी उच्च आहे त्यांना आपल्या जीवनशैलीबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे कारण कोलेस्ट्रॉल उच्च पातळीत घट न झाल्यास हार्ट अ‍ॅटकसह विविध हृदयासंबधित समस्या निर्माण होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते, औषधांशिवाय काही नैसर्गिक पर्याय आहेत जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकतात ज्यामध्ये काही विशिष्ट भाज्या खाण्याची शिफारस केली जाते. त्यापैकी एक म्हणजे लसूण.

लसणामध्ये बायोअ‍ॅक्टिव्ह संयुगे असतात ज्याला अ‍ॅसिलिन म्हणून ओळखले जाते जो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत करते. नको असलेले खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याशिवाय लसणाचे इतरही काही फायदे आहेत ज्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तदाब कमी करणे आणि उच्च अँन्टीऑक्सिंडट घटक पुरवणे यांचा समावेश होतो.

लसूण खराब कोलेस्ट्रॉल कसा कमी करू शकतो?( How does garlic reduce bad cholesterol?)

लसणाच्या पाकळ्यांची साल काढून सकाळी चावून खाल्यास तो उच्च कोलेस्ट्रॉल पातळी १५-२० दिवसांमध्ये कमी करू शकते. पण हे नेमके कसे घडते?

रक्तातील कोलेस्ट्रॉलवर लसणाचा होणारा परिणाम अभ्यासणारे अनेक संशोधन झाले आहे. या अभ्यासांनुसार,”लसणामध्ये आढळणारेअसिलिन जे सल्फरयुक्त संयुग आहे त्याचा कोलेस्ट्रॉलची पातळीत घट होण्याशी संबध जोडला आहे. मात्र, हे संयुग नेमके कोणत्या प्रक्रियेद्वारे कार्य करते याबाबत अद्याप स्पष्टता नाही आणि यावर संशोधकांमध्ये मतभेद आहेत.

व्हेरीवेल हेल्थच्या मते, इस्रायलमधील लिपिड आणि एथेरोस्क्लेरोसिस संशोधन संस्थेचा अभ्यासात असे सुचवेले आहे की, अॅसिलिन खराब कोलेस्ट्रॉल आणि यकृतामधील (लिव्हरमध्ये) LDL म्हणजेच लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन तयार होण्याची प्रक्रिया रोखू शकते.

या निष्कर्षांना अनेक संशोधनांमधून समर्थन मिळाले असले तरी, “या प्रक्रियेमुळे चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL (High-Density Lipoprotein) यांच्या पातळीवर कोणताही लक्षणीय परिणाम होत नाही असे आढळले आहे.”

तज्ज्ञांच्या मते, लसणाचा कोलेस्टेरॉलवर होणारा परिणाम डोस-डिपेंडंट ( मात्रेवर अवलंबून) असतो. म्हणजेच लसणाचे प्रमाण जास्त असल्यास LDL (वाईट कोलेस्टेरॉल) मध्ये तुलनेने जास्त घट दिसून येऊ शकते. याशिवाय, एखादी व्यक्ती जास्त काळ लसूण किंवा त्याचे सप्लिमेंट्स घेत असेल तर कोलेस्टेरॉल कमी होण्याचा परिणाम थोडा अधिक दिसू शकतो. मात्र अभ्यासांनुसार LDL मध्ये साधारण ६ ते ९ टक्के इतकीच घट दिसते. त्यामुळे फक्त लसूण खाल्ल्याने उच्च कोलेस्टेरॉलचा पूर्ण उपचार होऊ शकतो, असे म्हणणे योग्य नाही.

तज्ज्ञ असेही सांगतात की,”लसणाचा हा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतोच असे नाही, त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचारही आवश्यक असतात.”

लसूण किती प्रमाणात घेणे सुरक्षित आहे? (What is the safe dosage of garlic?)

लसणाचा योग्य वापर किती प्रमाणात करावा याबाबत ठोस अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. मात्र अनेक अभ्यासांनुसार,”कच्चा लसूण दररोज साधारण १ ते २ पाकळ्या (cloves) इतका घेणे सुरक्षित मानले जाते. लसूण अन्नासह किंवा अन्नाशिवायही घेता येतो.”

लसणाच्या सप्लिमेंट्सचे संभाव्य दुष्परिणाम (Possible side effects of garlic supplements)

जर लसणाचे सप्लिमेंट्स जास्त प्रमाणात घेतले तर काही दुष्परिणाम दिसू शकतात. हे बहुतेक वेळा सौम्य असतात आणि जास्त डोस घेतल्यावर अधिक जाणवतात. उदाहरणार्थ:

तोंडातून लसणासारखा वास येणे

शरीराला लसणासारखा वास येणे

पोटात वायू किंवा गॅस (Flatulence)

छातीत जळजळ (Heartburn)

अतिसार (Diarrhoea)

लसूण खाताना कोणी काळजी घेतली पाहिजे (Who should take garlic with caution? )

लसणामध्ये रक्त पातळ करण्याचे (blood-thinning) हलके गुणधर्म असतात. त्यामुळे ज्यांना रक्तस्त्रावाशी संबंधित आजार आहेत त्यांनी जास्त प्रमाणात लसूण घेणे टाळावे.

तसेच लसूण काही औषधांवर परिणाम करू शकतो. उदाहरणार्थ:

Cyclosporine – अवयव प्रत्यारोपणानंतर दिले जाणारे औषध

प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी वापरली जाणारी immunosuppressant औषधे

काही क्षयरोगावरील (anti-tuberculosis) औषधे

लसूण वरील औषधांची प्रभावीता कमी करू शकतो. त्यामुळे जर एखादी व्यक्ती नियमित औषधे घेत असेल तर लसणाचे सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.