Rope Skipping Benefits For Weight Loss : चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैलीचा परिणाम आता फक्त वयस्कर लोकांपर्यंत मर्यादीत राहिलेला नाही तर लहान मुले आणि वयस्कर लोकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. कमी वयात मुलांचे लठ्ठपणा, प्रीडायबिटीज आणि टाईप-२ डायबिटीज सारख्या समस्या वेगात वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये फिट राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे शार्टकट स्विकारतात ज्यापैकी एक आहे दोरीवर उड्या मारणे. आजकाल सोशल मीडियावर दोरीवर उड्या मारतानाचे (Rope Skipping) व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जातो की, रोज दोरीवर उड्या मारल्याने वजन कमी होते व वजन वाढते. त्याचबरोबर शरीर देखील तंदरुरस्त राहते. पण या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार आहे की ही चुकीची माहिती आहे जे आधी जाणून घेऊ या.
होमियोपेथिक तज्ज्ञ डॉ. मनदीप दहिया यांच्या मते दोरीवर उड्या मारणे हा एक उत्तम कार्डिया व्यायाम आहे जो फक्त वजन कमी करणे किंवा उंची वाढण्यापुरते मर्यादीत नाही तर पूर्ण शरीराला सक्रिय ठेवणारी आणि एक प्रभावी कार्डीओ व्यायाम आहे. नियमितपणे दोरीवर उड्या मारल्यास हृदय, फुफ्फुस, स्नायू आणि शरीराची कार्यक्षमता सुधारू शकते. मात्र, व्हिडिओमध्ये केलेल्या काही दाव्यांना मर्यादित वैज्ञानिक आधार आहे. रोज १०० वेळा दोरीवरच्या उज्या मारल्याने शरीरावर काय परिणात होतो ? कोणत्या फायद्यांमागे वैज्ञानिक आधारआहे आणि कोणत्या दाव्यांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे ते जाणून घ्या.
लसीका संस्था सक्रिय राहते (The lymphatic system remains active)
रोज जर तुम्ही दोरीवर उड्या मारल्या तर तुमची लसीका संस्था ( lymphatic system) सक्रिय राहते. ही प्रणाली शरीरातून अतिरिक्त द्रव, टाकाऊ पदार्थ आणि संसर्गाशी लढणाऱ्या पेशी वाहून नेण्याची भूमिका बजावते. हे शास्त्रीयदृष्ट्या खरे आहे की शारीरिक हालचाल आणि स्नायूंच्या हालचालींमुळे लसिका प्रवाह सुधारण्यास मदत होते, परंतु दोरी उड्या मारल्याने शरीरातील सर्व जंतुसंसर्ग नाहीसे होतात असे म्हणणे खरे ठरणार नाही.
जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजी आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या शोधानुसार, जेव्हा आपण दोरीच्या उड्या मारणे शरीरात वर आणि खाली हालचाल होते. ही गती लसिका वाहिन्या झटपट उघडण्यास व बंद करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील विषारी आणि संसर्गाशी लढणाऱ्या पांढऱ्या पेशी संपूर्ण शरीरात वेगात पसरतात.पण हे सर्व संसर्गावर उपचार करत नाही, तर ही तुमची अंतर्गत सुरक्षा प्रणाली सक्रिय करते.
वजन कमी करण्यास आणि शरीर तंदरुस्त ठेवण्यास करते मदत
Harvard Health Publishing च्या माहितीनुसार, दोरीवर उड्या मारणे सर्वात कार्यक्षम उर्जा खर्च करणारा व्यायाम आहे. दोरीवर उड्या मारणे ही उच्च-तीव्रतेचा कार्डिओ व्यायाम आहे ज्यामुळे झटपट उर्जा वापरली जाते. जर तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करत असाल तर वजन कमी करणे आणि शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. हे चयापचय सुधारते. तसेच स्टॅमिना सुधारण्यास देखील मदत करते.
दोरीवर उड्या मारल्याने वाढू शकते मुलांची उंची
दोरीवर उड्या मारल्याने थॉयराईड आणि पिट्यूटरी ग्लँड अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करते ज्यामुळे उंची वाढू शकते. पण वैद्यकीय विज्ञानानुसार, व्यक्तीची उंची विशेषत: आनुवांशिकता (Genetics) आणि ग्रोथ प्लेट्सवर अवलंबून असते. ग्रोथ प्लेट्स बंद झाल्यानंतर केवळ दोरी उड्या मारल्याने उंची वाढत नाही.
मानसिक आरोग्य आणि ऊर्जा पातळीवर होणारा परिणाम
नियमित दोरी उड्या मारल्याने शरीरात एंडोर्फिनसारखे ‘फील-गुड’ हार्मोन्स सोडले जातात, ज्यामुळे तणाव कमी होऊन मनःस्थिती सुधारते. यामुळे एकाग्रता वाढण्यास, थकवा कमी होण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. पण, वैद्यकीय शास्त्रानुसार दोरी उड्या मारणे हे नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांवर रामबाण उपाय नाही.
हार्मोनल आरोग्यावर परिणाम होतो
अमेरिकन जर्नल ऑफ सायकियाट्री आणि जागतिक पीसीओएस मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दोरी उडीसारख्या उच्च-तीव्रतेच्या व्यायामामुळे शरीरातील इन्सुलिन प्रतिरोध कमी होतो. इन्सुलिनची पातळी सुधारल्याने पीसीओएस, पीसीओडी आणि हार्मोनल असंतुलनाची लक्षणे व्यवस्थापित करण्यास मदत होते. दोरी उडीमुळे थायरॉईडसह हार्मोनल असंतुलनासारख्या समस्या सुधारू शकतात. वैज्ञानिकदृष्ट्या, नियमित व्यायामामुळे हार्मोनल आरोग्य सुधारण्यास आणि पीसीओएसमध्ये वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जरी दोरी उडी हा या आजारांवरचा इलाज नसला तरी, अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार आवश्यक आहेत.
यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
नियमितपणे दोरी उड्या मारल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जर तुम्ही दररोज दोरी उड्या मारल्या, तर रक्ताभिसरण वाढते आणि शरीर सक्रिय राहते. परंतु, यामुळे कर्करोग, दमा यांसारखे सर्व प्रकारचे संसर्ग बरे होतात, हा दावा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही.
दोरी उड्या मारण्याची योग्य पद्धत
डॉ. मनदीप यांच्या मते, दोरी उड्या सकाळी किंवा संध्याकाळी जेवणापूर्वी सुमारे तीन तास आधी सुरू करता येतात. सुरुवातीला १०-२० उड्या मारा आणि हळूहळू संख्या वाढवा. व्यायामापूर्वी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
कोणती खबरदारी घ्यावी?
जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोग, उच्च रक्तदाब, सांध्यांच्या गंभीर समस्या यांसारख्या इतर आरोग्य समस्या असतील, तर त्यांनी दोरी उड्या सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या लोकांना गंभीर हृदयरोग, हृदयाच्या झडपांच्या समस्या, गुडघे किंवा घोट्यांमध्ये तीव्र वेदना, ऑस्टिओपोरोसिस इत्यादी समस्या आहेत, त्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय दोरी उड्या सुरू करू नयेत. गर्भवती महिलांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हा व्यायाम करावा.
