Natural Plants For Diabetes : भारतात मधूमेहाच्या(Blood Sugar) रुग्नांची संख्या वेगात वाढत आहे त्यामुळे त्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जात आहे. चुकीचा आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे कमी वयोगटातील लोकही या आजाराला बळी पडत आहे. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर लोक रक्तातील साखरेची पातळी(ब्लड शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांचा आधार घेतात. काही मधुमेहाचे रुग्ण औषधांच्या सेवनाला कंटाळतात आणि रक्त नियंत्रित करण्यासाठी देशी उपायांकडे वळतात.

ऋषीमुनींनी याच आजारवर नियंत्रण मिळवण्यासाठी शतकानुशतके काही खास औषधी वनस्पतींचा शोध लावला आहे ज्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते,काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती अशा आहेत ज्यांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. स्टीव्हिया, इन्सुलिन वनस्पतीची पाने आणि गुडमारच्या पानांचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णाची ब्लड शुगर नॉर्मल पातळीवर राहू शकते.

पण आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियावर स्टीव्हिया(Stevia), इन्सुलिन वनस्पतीची पाने(Insulin Plant) आणि गुडमारच्या पानाबाबत कित्येक दावे केले जात आहे. काही लोक या पानांना मधुमेहावरील रामबाण उपाय देखील मानतात. पण खरचं या औषधी वनस्पती ब्लड शुगरची पातळी नियंत्रित करू शकते का? विज्ञान आणि आयुर्वेद या औषधांबाबत काय सांगते? याबाबत आयुर्वेद तज्ज्ञांचे मत काय आहे हे जाणून घ्या.

इन्सुलिन वनस्पतीची पाने करते ब्लड शुगर पातळी नॉर्मल (Blood sugar level becomes normal while receiving insulin therapy)

इन्सुलिनच्या पानांच्या वनस्पतीला शास्त्रीय भाषेत कॉस्टस इग्नियस (Costus igneus) किंवा कॅमाकोस्टस कस्पिडॅटस (Chamaecostus cuspidatus), ‘क्रेप जिंजर’ (Crepe Ginger)असे म्हणतात. मराठीत या वनस्पतीला इन्सुलिनचे झाड, किकंद अशी नावे आहेत. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, इन्सुलिनची पाने मधुमही रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. या पानांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी निंयत्रित करण्यास मदत करू शकते. सकाळी उपाशी पोटी याचा वनस्पतीची ताजी पाने चावून खाल्यास शरीरामध्ये ग्लूकोज पानांचा उपयोग करण्याची क्षमता सुधारू शकते, ज्यामुळे ब्लड शुगरची पातळी संतुलित राखण्यासा मदत करू शकते. इन्सुलिनची पानांमध्ये प्राकृतिक तत्व आढळले आहेत जे शरीरातील मेटाबॉलिज्मला मदत करते आणि ग्लुकोजच्या व्यवस्थापनात मदत करते. ही पानांची चव हलका, आंबट असतो. आयुर्वेदामध्ये याच वनस्पतीचे आरोग्यासाठी अनेक फायद्यांसाठी उपयोगी मानले जाते.

जर्नल ऑफ क्लिनिकल अँड डायग्नोस्टिक रिसर्च (JCDR) मध्ये प्रकाशित झालेल्या एका प्रसिद्ध क्लिनिकल अभ्यासानुसार, जेव्हा शास्त्रज्ञांनी मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर संशोधन केले, तेव्हा त्यांना आढळले की, इन्सुलिन वनस्पतीच्या पानांचा अर्क स्वादुपिंडाच्या(Pancreas) बीटा-पेशींना थेट उत्तेजित करतो. ह्याच त्या पेशी आहेत ज्या शरीरात नैसर्गिक इन्सुलिन तयार करतात. त्याच्या नियमित सेवनाने शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन सुधारते.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) येथे उपलब्ध असलेल्या ‘मधुमेह-विरोधी क्रिया’ (anti-diabetic activity) वरील अहवालानुसार, ह्या वनस्पतीच्या पानांमध्ये ‘कोरोसोलिक ॲसिड’ (Corosolic Acid) आढळते. हे ॲसिड पेशींमध्ये ग्लुकोजचे शोषण वाढवते, ज्यामुळे रक्तातील अतिरिक्त साखर त्वरित कमी होऊ लागते.

स्टीवियाच्या पानांचे कसे करावे सेवन (How to consume stevia leaves)

स्टीवियाच्या पानांना ‘मधुपर्णी’, ‘मधुपत्र’, किंवा ‘गोड तुळस’ (Sweet Tulsi) असेही म्हणतात. मधुमेही रुग्णांसाठी स्टीवियाची पाने साखरेचे नैसर्गिक रुप मानले जाते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि गोड खाण्याची इच्छा संतुष्ट करण्यास मदत करते. कित्येक संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, स्टीवोयल ग्लायकोसाइड्स ब्लड शुगरची पातळी वेगात वाढवते. नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन करणे ग्लूकोज नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. पण इन्सुलिन संवेदनीलता सुधारण्यासाठी मदत करू शकते.

‘द जर्नल ऑफ न्यूट्रिशन अँड फायटोमेडिसिन’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासानुसार,
स्टीवियाच्या पानांमध्ये मुख्यता दोन गोड संयुगे आढळतात – स्टीवियोसाइड (Stevioside) और रेबाउडियोसाइड (Rebaudioside).

शास्त्रज्ञांच्या संशोधनात आढळले की स्टीवियोसाइड सामान्यतः स्वादुपींडाच्या बीटा पेशींवर कार्य करते. हे रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी वाढल्यास स्वादुपिंडाला अधिक प्रमाणात इन्सुलिन सोडण्यास भाग पाडते ज्यामुळे शरीरात वाढलेली ब्लड शुगर पातळी नॉर्मल होऊ लागते.

गुडमारच्या पानांचे कसे करावे सेवन (How to consume Gudmarcha leaves )

गुड़मारच्या पानांना मराठीत ‘बेडकीचा पाला’, ‘कावळी’, किंवा ‘कालिकादोरी’ असे म्हणतात. ‘शास्त्रीय भाषेत याला Gymnema Sylvestre आणि संस्कृतमध्ये ‘मधुनाशिनी’ म्हणतात.गुडमारच्या पाने ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी उपयोगी औषधी वनस्पती मानले जाते. योगगुरू रामदेव बाबा यांच्या मते, या पानांमध्ये असे नैसर्गित तत्व आढळतात जे गोड खाण्याची इच्छा कमी करतात आणि ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. कित्येक संधोशनामध्ये गुडमारच्या पानांना मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर असल्याचे सांगितेल आहे. आयुरेवदिक तज्ज्ञांच्या सल्यानुसार,या पानांचे सेवन नियमितपणे केल्याने आणि योग्य प्रमाणात केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

जर्नल ऑफ डायटरी सप्लिमेंट्सनुसार जेव्हा गुडमारच्या पानांचे सेवन करता तेव्हा जिम्नेमिक आम्लाची(Gymnemic acid) आण्विक रचना(Molecular Structure) अगदी ग्लुकोजसारखीच असते. ही तुमच्या जीभेवर गोड चव ओळखणारे रिसेप्टर्सला पूर्णपणे ब्लॉक करते. त्यानंतर जर तुम्ही साखर किंवा मिठाई खाली तरी त्याची चव तुम्हाला जाणवत नाही ज्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा त्वरित समाप्त होते