How To Clean Stomach: बद्धकोष्ठता ही एक समस्या आहे ज्याचा त्रास अनेक लोकांना होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास काय असतो हे माहितच नाही अशा लोकांची संख्या फार कमी आहे. रोज सकाळी बाथरुममध्यो जोर लावतात पण सहजा सहजी पोट साफ होत नाही. पोट व्यवस्थित साफ झाले नाही किंवा शौच करताना जास्तीचा जोर लावल्याने आतडे आणि गुद्द्वारसंबधीत गंभीर आजार होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये आयुर्वेदित डॉक्टर सलीम जैदी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे व्हिडीओ शेअर केला जातो आणि सांगितले जाते की, पोट साफ करण्यासाठी काय खाल्ले पाहिजे? डॉक्टरांनी सांगितलेला हा उपाय झटक्यात पोट साफ करण्यास मदत करेल.

त्वरित पोट साफ करण्यासाठी काय खावे? (What to eat to cleanse the stomach quickly?)

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांचे मत आहे की, जर तुम्हाला कब्जची समस्या आहे तर त्यासाठी फक्त औषधे घेत राहणे योग्य नाही कारण त्यामुळे व्यक्तीला औषधांची सवय लागू शकते आणि बद्धकोष्ठतेची समस्या आणखी वाढू शकते आणि त्रासदायक ठरू शकते.

डॉ. सलीम जैदी सांगतात की, हाय फायबर फूड्स पोट साफ करण्यासाठी फायदेशीर ठरते. हाय फायबर फूड्समध्ये संपूर्ण धान्य, बिया, फळे आणि भाज्यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते.

कोणत्या उपायामुळे झटक्यात पोट साफ होते. (Which remedy instantly cleanses the stomach?)

झटपट पोट साफ होण्यासाठी तुम्हाला खूप काही खायची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त ओवा गुळची आवश्यकता आहे. एक छोट चमचा ओवा आणि २ मोठे चमचा खिसलेला गुळ किंवा गुळाचे तुकडे घ्या. रात्री ओवा आणि गूळ चावून खा आणि त्यानंतर गरम पाणी प्या.

डॉ. सौरभ सैठी सांगतात की, तुम्हाला अधिक चांगला फायदा हवा असेल तर ओवा चांगला भाजून घ्या. जेव्हा त्याचा वास येऊ लागेल तेव्हा त्यात गुळ टाकून खा. त्यामुळे झोपण्याआधी हे खा आणि मग गरम पाणी प्या.

हा उपाय किती फायदेशीर आहे? (How beneficial is this solution?)

ओव्यामध्ये थायमोल असते, जे पचनसंस्थेला उत्तेजित करते. यामुळे पचनसंस्थेत सुधारणा होते. गूळ ही एक नैसर्गिक साखर आहे, जी आतड्यांमध्ये पाणी खेचून मल मऊ करते, ज्यामुळे ते बाहेर टाकणे सोपे होते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ही उपास काही दिवस करून पाहिला, तर दिर्घकाळाची बद्धकोष्ठता देखील बरा होऊ शकतो.

तज्ञांचा सल्ला आहे की, बद्धकोष्ठतेपासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी आणि शौचास सुलभ होण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम राखणे महत्त्वाचे आहे.