Winter Vegetable for Uric Acid: हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात एक समस्या मात्र अनेकांना शांत बसू देत नाही, ती म्हणजे युरिक ॲसिड. हातापायांत जाणवणारी सततची ठणकणारी वेदना, चालताना येणारी अडचण, गुडघ्यांतील जळजळ, बोटांमध्ये चुटपूट… आणि त्यातही रक्तात साचणारी टॉक्सिनची वाढ. डॉक्टर सांगतात, आजच्या बदलत्या आहारपद्धती आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे ही समस्या विजेच्या वेगाने वाढू लागली आहे.

दिवसभर ताण, कमी पाणी पिणे, जंक फूड, फ्राय पदार्थ, रेड मीट, शुगर, पॅक्ड ज्यूस, फ्रुक्टोज आणि दारू हे सगळं युरिक ॲसिड वाढवणारं. त्यात पुन्हा प्रोटीनयुक्त काही पदार्थ राजमा, मसूर, सोयाप्रॉडक्ट्स, चणे, बीन्स हेही शरीरात प्युरीन वाढवतात आणि युरिक ॲसिडचा स्तर आणखी उंचावतो.

युरिक ॲसिड वाढलं की समस्या फक्त सांधेदुखीची नसते, ती शरीरात हळूच टॉक्सिन साचण्याची, किडनीवर ताण वाढण्याची आणि सूज येण्याची चेतावणी असते. एकदा का शरीरात प्युरीन हद्द ओलांडायला लागली की रक्तातील अशुद्धता बाहेर काढण्यासाठी नुसती औषधे पुरेशी पडत नाहीत; आहार बदलणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण, या सर्व गोंधळातही एक गोष्ट अनेकांना माहीत नसते. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी काही नैसर्गिक भाज्या ‘औषधासारख्या’ काम करतात.

असेच एक गुपित आयुर्वेदिकतज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी उलगडले आहे. त्यांच्यानुसार, थंडीच्या दिवसात मिळणारी एक खास भाजी शरीराला केवळ हलकीच करत नाही, तर किडनीतील डिटॉक्स प्रक्रिया वेगवान करते. रक्तातील अशुद्धता कमी होते आणि युरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत होते.

इतकंच नाही, तर या भाजीत असणारा नैसर्गिक डाययुरेटिक गुणधर्म शरीरातील घातक अम्लांना मूत्राद्वारे बाहेर ढकलतो. सांध्यांतील वेदना, सूज आणि जडपणा हळूहळू कमी होऊ लागतो. अगदी घरातील वरिष्ठ व्यक्ती ज्यांना चालणे अवघड होते, त्यांनाही या भाजीतून आराम मिळत असल्याचे अनुभव काही लोकांनी सांगितले आहेत.

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, या भाजीत प्युरीन जवळजवळ नसते, म्हणून ती युरिक ॲसिड वाढवत नाही. उलट, या भाजीत असतात

  • फायबर
  • व्हिटॅमिन C
  • कॅल्शियम
  • आयरन
  • अँटीऑक्सिडंट
  • अँटीबॅक्टेरियल घटक

हे सगळे घटक मिळून किडनीची कार्यक्षमता वाढवतात, शरीरातील सूज कमी करतात आणि पचनक्रिया सुधारतात यामुळे या भाजीतून

  • किडनी डिटॉक्स होते
  • लिव्हर हेल्थ सुधारते
  • पचनशक्ती बळकट होते
  • मधुमेह नियंत्रणात राहतो
  • रोगप्रतिकारशक्ती वाढते
  • हृदयाचे आरोग्य चांगले राहते

आता प्रश्न उठतो ही भाजी आहे तरी कोणती?

थंडीच्या दिवसांत जवळजवळ प्रत्येक बाजारात सहज उपलब्ध… किंमतही कमी… पण, गुण मात्र इतके प्रचंड की आयुर्वेदातही तिचे वर्णन ‘अमृतासमान’ म्हणून केले गेले आहे. होय ही भाजी म्हणजे मुळा.

आचार्य बालकृष्ण सांगतात, थंडीत मिळणारा ताजा मुळा शरीरातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. मुळ्यातील डाययुरेटिक घटक किडनीला मूत्राद्वारे विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात, रक्तातील टॉक्सिन कमी करतात आणि सांधेदुखीची लक्षणे आटोक्यात ठेवण्यास सहाय्यक असतात.

कच्चे सॅलेड म्हणून भाजीमध्ये, रस काढून किंवा सूपामध्ये कोणत्याही स्वरूपात हा मुळा सेवन केल्यास शरीरातील अम्लता कमी होते आणि किडनी-लिव्हरची कार्यक्षमता सुधारते.

युरिक ॲसिडचा त्रास असेल, सांध्यात खूप वेदना होत असतील किंवा रक्तातील घाण साचत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असेल तर थंडीच्या दिवसांत रोजच्या आहारात मुळा समाविष्ट करणे शरीराला नैसर्गिक दिलासा देऊ शकते, असे आयुर्वेदात मानले जाते.