शारदीय नवरात्री म्हणजेच आदिशक्तींच्या उपासनेचा पवित्र सण आजपासून सुरु झाला आहे. यंदा २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या या पावन काळात देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते, तसेच या दिवसांमध्ये अनेकजण उपवासही करतात. अशी मान्यता आहे की या काळात भक्तिभावाने केलेल्या पूजेमुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यंदा तब्बल नऊ वर्षांनी देवी हत्तीवर स्वार झाली आहे आणि त्यावर स्वार होऊनच तिचे विसर्जन होणार आहे. यानिमित्ताने तुम्ही खास संदेश पाठवून तुमच्या प्रियजनांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

नव कल्पना, नव ज्योत्सना,
नव शक्ति, नव आराधना,
नवरात्रीच्या शुभ सणात पूर्ण होवोत तुमच्या सर्व मनोकामना.
तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

कुंकुवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

Navratri 2022: नवरात्रीच्या ९ दिवसासाठी देवीच्या ९ नावांचे खास मंत्र; यंदा ‘या’ रूपात अवतरणार आदिशक्ती

हत्तीवर स्वार होऊनि,
आनंदाचे वरदान घेवोनि,
प्रत्येक घरात झाले आंबे मातेचे आगमन.
तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

नवरात्रीचे हे नऊ दिवस आणि नऊ रात्री तुमच्यासाठी चांगले आरोग्य आणि भाग्य घेऊन येवो.
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

सर्व मंगल मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते ।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमच्यावर सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुम्हाला सदैव सरस्वतीची साथ मिळो,
तुमच्या घरात सदैव गणेशाचे वास्तव्य असो,
माँ दुर्गेच्या आशीर्वादाने प्रकाश तुमचे आयुष्य अधिक प्रकाशमय होवो…
तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wish your loved ones auspicious wishes on the occasion of shardiya navratri 2022 pvp
First published on: 26-09-2022 at 11:21 IST