सध्याच्या काळात मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. सुरुवातीला केवळ वयस्कर लोकांमध्ये पाहायला मिळणारा हा आजार आता कोणत्याही वयोगटातील लोकांना होण्याचा धोका वाढू लागला आहे. मधुमेह हा आजार महिला आणि पुरुष दोघांनाही होत असला, तरीही तो महिलांसाठी जास्त हानिकारक ठरतो. म्हणून या आजाराची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

मधुमेह या आजारामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, काही उपायांचा वापर केल्याने महिला मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण मिळवू शकतात. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांना असे आढळून आले की ज्या महिलांना गर्भधारणेदरम्यान मधुमेहाचा इतिहास आहे त्यांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून मधुमेहाचा धोका कमी केला आहे.

Health News : घाम न येणंही आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; जाणून घ्या, नेमकं काय होतं

या अभ्यासानुसार, मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी महिलांनी आपल्या जीवनशैलीमध्ये पाच गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवं. योग्य वजन, उच्च गुणवत्तेचा आहार, नियमित व्यायाम, कमी मद्यपान करणे आणि धूम्रपान न करणे या गोष्टींची काळजी महिलांनी घ्यायला हवी. ज्या महिलांनी आपल्या जीवनशैलीत या गोष्टींचा अवलंब केला त्यांच्यामध्ये मधुमेहाचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे दिसून आले.

निरोगी जीवनशैली चांगल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असून ती आपल्याला मधुमेहासह इतर अनेक गंभीर आजारांविरुद्ध लढण्यास मदत करते. या संशोधनकांनी आपल्या अभ्यासासाठी गर्भधारणेदरम्यान मधुमेहाचा इतिहास असणाऱ्या ४,२७५ महिलांची निवड केली. २८ वर्षांमध्ये या संशोधनातील बदल मोजले गेले. यामध्ये ९२४ महिलांना टाइप २ मधुमेह झाला, तर ज्या महिलांनी सर्व नियमांचे पालन केले त्यांना टाइप २ मधुमेहाच धोका ९० टक्क्यांहून कमी झाला.