बोस्टनच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
पुरेशी झोप न घेणाऱ्या महिलांमध्ये टाइप-टू मधुमेह बळावण्याची शक्यता अधिक असल्याचा इशारा हॉवर्ड विद्यापीठातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
संशोधकांच्या मते, हा धोका बळावण्याची शक्यता ४७ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. जेव्हा विविध कारणामुळे झोपेचे वेळापत्रक बिघडण्याचे सत्र सुरू होते, त्यावेळी हा मधुमेह बळावण्याचीही शक्यता असते. यासाठी बोस्टनमधील हॉवर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी मधुमेह नसलेल्या १३ लाख ३ हजार ३५३ महिलाच्या आरोग्याचा अभ्यास केला.
‘झोप न येणे’ या आजाराचे मूल्यमापन हे ‘झोप येण्यातील अडचणी’ किंवा ‘जागरूक झोप’ ‘नेहमीच’ किंवा ‘बऱ्याच वेळा’ असे केले जाते. यावेळी घेण्यात आलेल्या आढाव्यातून ६ हजार ४०७ जणांमध्ये टाइप-२चा मधुमेह बळावण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागल्याचे दिसून आले. यापैकी ज्या महिलांनी दोन किंवा जास्त वेळा झोप मोडण्याच्या (झोप येण्यासंबधी अडचण, वारंवार घोरणे, ६ तासांपेक्षा कमी झोपेचा कालावधी आणि झोपेत श्वास घेण्यास होणारा त्रास) या शक्यता आहेत त्यांना टाइप-२ चा मधुमेह बळावण्याचा धोका हा अधिक असतो.
नेहमीच्या जीवनशैलीत नियोजन करण्याची मानसिकता आणि झोप येण्याबाबतची अडचणींमुळे (अभ्यासातील झोपेतील विस्कळीतपणाचे एक कारण), टाइप-२चा मधुमेह बळावण्याची शक्यता ४५ टक्क्य़ांनी वाढवते, तर उच्च रक्तदाब, नैराश्य आणि शरीराच्या सामूहिक निर्देशांक (बीएमआय)नुसार त्यात २२ टक्क्य़ांनी बदल झाल्याचे देखील सातत्याने होणाऱ्या नव्या मोजमापातून स्पष्ट झाले.
झोपेसंबंधी कोणत्याही प्रकारची अडचण नसलेल्या महिलांच्या तुलनेत ज्या महिलांमध्ये चार शक्यतांपैकी एक शक्यता आहे, त्यांना टाइप-२चा मधुमेह बळावण्याची शक्यता ४७ टक्क्य़ांनी वाढते. तर नंतर हा धोका दोन शक्यता असलेल्यांमध्ये दुपटीने, तीन शक्यता असलेल्यांमध्ये तिपटीने आणि चार शक्यता असलेल्या महिलांमध्ये चार पटीने वाढल्याचे दिसून आले.
झोप न येण्याचा संबंध नक्कीच टाइप-२ च्या मधुमेहाशी आहे. तसेच उच्च रक्तदाब,बीएमआय आणि नैराशाच्या लक्षणांशीदेखील असल्याने त्याचा संबंध हा झोपेच्या विस्कळीतपणालादेखील कारणीभूत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. हा निष्कर्ष ‘डायबेटोलोजिया’ या जनरलमधून प्रसिद्ध झालेला आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)