Vat Purnima 2024 : वट पौर्णिमा ही दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया नऊवारी किंवा साडी नेसतात आणि दागदागिने परिधान करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. (Vat Purnima 2024 : check photo poses for Vat Purnima look)
हल्ली सोशल मीडियावर सणावाराला फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याची क्रेझ खूप वाढली आहे. अशात तुम्ही जर वटपौर्णिमेच्या दिवशी फोटोशुट करणार असाल किंवा सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण आज आपण वटपौर्णिमेला सुंदर फोटो पोझ कशा द्यायच्या याविषयी जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वटपौर्णिमेला साडी किंवा नऊवारी साडीवरील हटके फोटो पोझ सांगितल्या आहेत.

हेही वाचा : चार मित्र, दोन बाईक्स अन् एक लाख अंतराची मोटरबाईक राईड! कोण होते भारतातील पहिले रायडर्स पाहा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल जी साडीवर सुंदर पोझ कशा द्यायच्या, हे करून दाखवत आहे. ती एकूण सहा फोटो पोझेस सांगताना दिसते. सुरुवातीला ती स्वत: एक एक पोझ कशी द्यायची, हे सांगते आणि त्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्या पोझेसमध्ये काढलेले फोटो दाखवते. या पोझेस पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ सेव्ह करावासा वाटेल. अनेकदा फोटो काढताना पोझ कशी द्यायची, असा मोठा प्रश्न पडतो पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. हा व्हिडीओ अनेक महिलांना आवडेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : हेडफोन वापरताय? अलका याग्निक यांच्यासारखा तुम्हालाही होऊ शकतो हा गंभीर आजार? जाणून घ्या सविस्तर

janhaviajayofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवविवाहीत मुलींसाठी वटपौर्णिमेसाठी खास पोझेस” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्व पोझेस छान आहेत.” तर एका युजरने लिहिलेय, “सेव्ह करून ठेवते, जेव्हा लग्न होईल तेव्हा कामात येईल” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजकाल बायका वटपूजन कमी करतात पण फोटो जरा जास्त काढतात, मोहमाया” अनेक युजर्सना या फोटो पोझेस आवडल्या आहेत.