आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात अत्यंत सक्षमपणे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे. तिच्या याच यशाचा सन्मान म्हणून आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून केलेल्या प्रगतीचं प्रतीक म्हणून अमेरिकेत दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी महिला समानता दिन साजरा केला जातो. अमेरिकेत २६ ऑगस्ट १९२० रोजी १९ व्या घटना दुरुस्तीनंतर प्रथमच महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. तर वकील बेला अबजुग यांच्या प्रयत्नांमुळे २६ ऑगस्ट १९७१ सालापासून महिलांना समान दर्जा देण्याची सुरुवात झाली. यापूर्वी अमेरिकन महिलांना द्वितीय श्रेणीच्या नागरिकांचा दर्जा होता. त्यामुळे, अमेरिकेतील महिलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा आहे.

महिला समानता दिन का साजरा करतात?

महिला समानता दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणं हा आहे. दुसरीकडे, महिलांवरील वाढते अत्याचार, भेदभाव, गैरवर्तन, बलात्कार, हल्ले इत्यादी अनेक मुद्यांवर जनगागृतीचा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. खरंतर या सगळ्याशी दोन हात करत स्त्रिया सक्षमपणे पुढे जात आहेतच. मात्र, मुळात त्यांच्यावर या समस्यांचा सामना करण्याची वेळ येऊच नये असा एक समाज घडवणं हा उद्देश आहे.

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

इतिहास

२६ ऑगस्ट १९७० रोजी १९वी घटनादुरुस्ती मंजूर झाल्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, राष्ट्रीय महिला संघटनेने (NOW) महिला समानतेसाठी संप, महिलांच्या समान हक्कांसाठी देशव्यापी निदर्शनं करण्याचं आवाहन केलं. अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी अधिकृतपणे ही तारीख महिला हक्क दिन म्हणून घोषित केली. असं करणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

२०२० मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिला समानता दिनाबाबत बोलताना म्हणाले होते कि, “महिला समानता दिनी, आम्ही आमच्या राष्ट्राला प्रेरणा देणाऱ्या आणि सुधारणा करणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करतो. त्यांची प्रतिभा आणि कठोर परिश्रम आमची अर्थव्यवस्था, आमची कुटुंब आणि आमचा समाज मजबूत करतात आणि आमची अनोखी अमेरिकन जीवनशैली टिकवून ठेवतात.”

२०१६ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षी म्हणाले, “महिला समानता दिनाला जेव्हा आम्ही अनेक महिलांनी मिळवलेल्या कष्टांना ओळखलं आहे, तेव्हा आम्ही सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी, महिला आणि मुलींसाठी सर्व क्षेत्रांत संधी वाढवण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित केलं आहे.”