देशातील ११ राज्यं, केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांचे Sex Partners हे पुरुषांपेक्षा अधिक; मात्र जोडीदाराशिवाय इतरांशी शरीरसंबंध ठेवण्यात…

केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आली आहे.

देशातील ११ राज्यं, केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांचे Sex Partners हे पुरुषांपेक्षा अधिक; मात्र जोडीदाराशिवाय इतरांशी शरीरसंबंध ठेवण्यात…
राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षणातून समोर आली आकडेवारी (प्रातिनिधिक फोटो)

भारतामधील ११ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महिलांचे सेक्स पार्टनर्स हे पुरुषांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीमधून ही माहिती उजेडात आली आहे. महिलांचे सेक्स पार्टनर्स अधिक असले तरी आपला जोडीदाराशिवाय इतरांशी संबंध ठेवण्यात भारतीय पुरुष महिलांपेक्षा आघाडीवर आहेत. जोडीदार नसणारी किंवा ज्याच्यासोबत एकत्र राहत नाही अशा व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवण्यात भारतीय पुरुष हे महिलांपेक्षा आघाडीवर आहेत. जोडीदार वगळता इतर महिलांसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या पुरुषांचे प्रमाण हे चार टक्के असून तुलनेनं अशा महिलांचं प्रमाण हे केवळ अर्धा टक्का इतकं आहे.

देशातील ११ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महिलांचे पुरुषांच्या तुलनेत अधिक सेक्स पार्टनर आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणामध्ये एक लाख १० हजार महिला आणि एक लाख पुरुष सहभागी झाले होते. याच सर्वेक्षणामधील आकडेवारीमधून पुरुषांपेक्षा महिलांचे सेक्स पार्टनर अधिक असल्याचं ११ राज्यांमध्ये आढळून आलं आहे.

राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, आसाम, केरळ, लक्षद्विप, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील महिलांचे सेक्स पार्टनर हे पुरुषांच्या सेक्स पार्टनरच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं आहे. राजस्थानमधील महिलांच्या आणि पुरुषांच्या सेक्स पार्टनर्सच्या संख्येत सर्वाधिक फरक आढळून आला आहे. येथे प्रत्येक महिलेच्या सरासरी ३.१ सेक्स पार्टनरच्या तुलनेत पुरुषांच्या महिला जोडीदारांची संख्या १.८ इतकी आहे.

मात्र सोबत न राहणाऱ्या किंवा पत्नी अथवा लिव्हइनमध्ये नसलेल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात भारतीय पुरुष हे महिलांपेक्षा आघाडीवर आहेत. १२ महिन्यातील आकडेवारीनुसार जोडीदार नसणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या पुरुषांची टक्केवारी चार इतकी असून महिलांच्या बाबतीत हीच टक्केवारी ०.५ इतकी आहे.

पाचवं राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वोक्षण २०१९-२१ दरम्यान देशातील २८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ७०७ जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं. सरकारी धोरणं ठरवण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Kitchen Hacks: करपलेली कढई झटक्यात करा स्वच्छ; कांदा, कोकम व ‘हे’ पदार्थ आहेत उपाय
फोटो गॅलरी