अनेकदा स्त्रिया त्यांच्या दररोजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरतात. तसेच आरोग्य सोबतच शरीराची देखील जितकी काळजी घेतली पाहिजे तितकी घेत नाहीत. सौंदर्य हे बाह्य नसून अंतर्गत देखील असते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर तंदुरुस्त राहते तेव्हा त्याला आत्मविश्वास वाटू शकतो. महिलांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ काढण्याची नितांत गरज असते. काही अतिशय सोपे योगासने ती दिवसभरात करू शकते. शरीराला निरोगी, लवचिक आणि चपळ बनवण्यासोबतच ही योगासने आणखी अनेक फायदे देतात आणि यामुळे तुमचे शरीर वयापेक्षा खूपच तरुण वाटू लागते. अशा स्थितीत ४० मध्येही तुम्ही २५ वर्षांचे दिसू लागाल आणि हा बदल तुम्हालाही जाणवेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. महिलांनी ही नियमित दोन योगासने रोज करू शकतात. त्यांचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत.

चक्रासन

अभिनेत्री आश्का गोराडिया देखील स्वतःला तंदुरुस्त निरोगी ठेवण्यासाठी हे योग आसन नियमित करत असते. चक्रासन केल्याने शरीराचे स्नायू चांगले राहतात, फुफ्फुसांना फायदा होतो, शरीराचे वजन नियंत्रणात येते आणि शरीर लवचिक होते.

photo credit: jansatta

चक्रासन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि पाय जमिनीवर ठेवून गुडघे वर करा.

आपले हाताचे तळवे कानाजवळ जमिनीवर ठेवा.

आता हात पाय जमिनीवर ठेवा आणि शरीराला वर उचला.

तुमचे शरीर इंद्रधनुष्याच्या आकारात उठेल.

आपले डोके मागे झुकत ठेवा आणि आसन संतुलित करा.

अंजनायासन

हे आसन खास वजन कमी करण्यासाठी केले जाते. यासोबतच पचनक्रिया सुधारते, शरीरात रक्ताभिसरण चांगले राहून शरीरातील ताणतणाव कमी होऊन लवचिकताही येते.

(photo credit:indian express/ malaikaaroraofficial/Instagram)

हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसून एक पाय पुढे आणि दुसरा मागे ठेवा.

आता तुमचे हात वरच्या दिशेने ओढा.

आपले डोके मागे उचला, मानेची काळजी घ्या.

आता एक मिनिट मुद्रेत राहा आणि दीर्घ श्वास घ्या.